गरीब रुग्णाच्या उपचारासाठी सरसावले गावक-यांचे हात
गरीब रुग्णाच्या उपचारासाठी सरसावले गावक-यांचे हात
अशा परिस्थितीत बालु नेवारे सारखे समाजशिल व्यक्तिमत्व समोर येतं ,काही तरी मार्ग काढावा लागतो. अशातच गावकरी एकत्र येतात.आणी मग समोर येतात अनेक मदतीचे हात.व नंतर होतो उपचारासाठी मोठ्या मानवसेवी रुग्णालयात जाण्याचा प्रवास, ही परिस्थिती उदभवली आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर. तालुक्यातील मोरगाव येथील राऊत कुटुंबावर.
याबाबत सविस्तर असे की अर्जुनी मोर तालुक्यातील मोरगाव येथील हिवराज तुलाराम राऊत वय ३० वर्ष या तरुणाची परिस्थिती बेताचीच आहे. भूमीहीन असलेला हिवराज चा परिवार हातावर आणुन पानावर खाणारा परिवार असे म्हणायला वावगे ठरणार नाही. स्वता अविवाहित असलेला हिवराज कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी अर्जुनी मोर. शहरातील कधी कापड दुकानात अल्पशा मजुरीवर काम करायचा तर कधी मिळेल तो काम करुन पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबाला सहाय्यता करायचा.
अशातच हिवराज ला हॄदयरोगाने ग्रासले.हॄदयरोगावर शस्रक्रिया करने खर्चाची बाब अशातच त्यांना कुणीतरी कर्नाटकातील पुट्टपती येथे विनामूल्य उपचार करुन हॄदयशस्रक्रीया केली जाते.ही माहीती मिळाली. मात्र एवढ्या लांबदुर परराज्यात जाण्यासाठी गरीब परिस्थिती आळ आली.अशातच मोरगाव येथीलच आदिवासी गोवारी समाज संघटनेचे युवा सामाजिक कार्यकर्ते बालु नेवारे यांनी पुढाकार घेतला. गोवारी समाज बांधवांना एकत्रीत करुन सर्वांना परिस्थीतीची जाणीव करुन देण्यात आली. आणी मग समाज संघटना पुढे आली.आदिवासी गोवारी समाज, मोरगाव ग्रामवासी, व अर्जुनी मोर. तालुक्यातील दानशुर व्यक्तीकडून मदतीचा ओघ सुरु झाला.
समाज बांधवांच्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने हिवराज राऊत यांना पुढील उपचारासाठी पुट्टपती कर्नाटक येथे पाठविण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत