Breaking News

बौद्ध समाज बांधवांनी कांचनगंगा सोसायटीत धार्मिक उत्सवासाठी जागा मिळण्याची मागणी

 बौद्ध समाज बांधवांनी कांचनगंगा सोसायटीत धार्मिक उत्सवासाठी जागा मिळण्याची मागणी

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, सतीश भालेराव,हिंगणा : हिंगणा तालुक्यातील मौजा मोंढा येथे सर्वात मोठी व जुनी कांचनगंगा टाऊनशीप असलेल्या वसाहतीत सुमारे दीड ते दोन हजार कुटुंब वास्तव्यास असून सर्व धर्मीय  नागरिक येथे वसाहत निर्माण झाल्यापासून राहतात. परंतु यावर्षी येथे सोसायटी स्थापन करण्यात आली असून वसाहतीत फक्त गणपती मंदिर बांधलेले असल्याने इतर  धार्मिक उत्सवासाठी जागेची तरतूद बिल्डरनी केलेली नाही.

या वसाहतीत बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने राहत असल्याने बौद्ध बांधवांना उत्सव साजरा करण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने कांचनगंगा बौद्ध समाज संघटना (प्रस्तावित) यांनी आज दि ७ मे रोजी सोसायटीला जागा उपलब्ध करून देण्याबात निवेदन सादर केले.

कांचनगंगा येथील वसाहत परीसरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, उदा. बुद्ध वंदना, बुद्ध जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिन इत्यादी कार्यक्रम करण्याकरीता तथा पंचशिल झेंडा, लावण्याकरीता कांचनगंगा को- ऑपरेटीव हाऊसिंग सोसायटी अखत्यारीत परिसरातील जागा दर्शवावी. त्याकरिता एका आठवड्याच्या आत नकाशानुसार जागा दाखवून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे याप्रकारच्या मागणीचा उल्लेखही निवेदनात नमूद करण्यात आला आहे. जेणेकरून आम्हास तेथे कार्यक्रम साजरे करता येईल. अशा मागणीचे निवेदन आज सोसायटीच्या कार्यालयात सादर करण्यात आले.

मोंढा येथील कांचनगंगा बुद्धिस्ट सोसायटी असोसिएशनच्या वतीने मनोज मेश्राम, एम.पी. बोंदाडे, राहुल पाटील सर, मेश्राम ताई, शंभरकर ताई, पल्लवी पाटील, आरती माटे, बनसोड, शालिनी शंभरकर, मार्तंड गजभीये, सतीश आदींच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत. याप्रसंगी कांचनगंगा वसाहतीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत