तांदलवाडी गावातील हिरा गेला पडद्याआड, आकस्मात मुत्यु झालेल्या प्रतिकच्या परिवाराला मदतीची गरज
शासनाच्या वतीने ५ लाख रुपये मदत मिळवुन द्यावी व प्रतिकच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्या : सविधान आर्मी
सविधान आर्मीच्या वतीने रावेर तहसीलदारांना देण्यात आले निवेदन
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : रावेर तालुक्यातील तांदलवाडी वाल्मिकी नगरातील रहिवासी सुरेश कोळी यांच्या एकुलता एक मुलगा प्रतिक सुरेश कोळी हा शांत संभावाचा व समाजाला व गावाला आवडता मुलगा होता पंरतु उन्हांचे तांपमान मोठ्याप्रमाणात असुन प्रतिक दि.१७/५/२०२२ रोजी मित्रा कडे हळदीच्या कार्यक्रम असल्याने तेथे हजर होता.
त्याला रात्री १० वाजता अस्वस्थ वाटु कसेबसे वाटायला लागले तसेच तो अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने तात्काळ त्याला स्थानिक दवाखान्यात नेन्यात आले, त्याची परिस्थिती गंभीर आहे असल्याने जवळच्या गावी सावदा येथे हलविण्यात आले त्याला डॉक्टर यांनी पाहिले असतात मुत्यु घोषित केले त्याची खबर विशाल सोनवणे यांनी निभोरा पोलीससात दिली असता त्यांच्या खबरीवरुन अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे.
वाढत्या उन्हाच्या कडाक्यात प्रतिक सुरेश कोळी रा तांदलवाडी यांना अच्यानक चक्कर येऊन पडुन अक्समात मुत्यु झालेला आहे आई वडिलांच्या एकुलता एक मुलगा आई वडील यांच्या आधार निघून गेलेला आहे तरी अश्या त्यांच्या वुध्द आई वडिलांना शासनाच्या वतीने ५ लाख रुपये मदत मिळवुन घावी व त्याच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी,
असे निवेदन रावेर नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिले निवेदन देताना सविधान आर्मी चे युवा जळगाव जिल्हाध्यक्ष मा सिध्दार्थ झाल्टे रावेर तालुका अध्यक्ष अशोक अटकाळे आदिवासी सेलचे तालुका उपाध्यक्ष लालखा तडवी दिव्यांग रावेर तालुका उपाध्यक्ष कामीलभाई रावेर शहरध्यक्ष समीर शे सलिम्उद्दिन रावेर शहर कार्यध्यक्ष ईरफान तडवी व सर्व सविधान आर्मी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत