आशियाई क्रीडा स्पर्धेत काजोलने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून नाव उज्ज्वल करावे. आमदार सुधीर गाडगीळ
आशियाई क्रीडा स्पर्धेत काजोलने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून नाव उज्ज्वल करावे. आमदार सुधीर गाडगीळ
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, सांगली : खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या काजोल सरगरचा सत्कार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आज करण्यात आला. काजोलने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
हरियाणा येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत काजोलने ४० किलो गटात सुवर्णपदक पटकावले होते. काजोलने मिळवलेल्या या यशाबद्दल आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज तिचा सत्कार करून अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले स्वर्गीय नाना सिंहासने यांच्या दिग्विजय व्यायाम मंडळ व प्रशिक्षक मयूर सिंहासने यांची विद्यार्थी असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे तिने प्रतिनिधित्व करावे व आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावून भारताचे आणि सांगलीचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या शिवाय तिला लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी पालक महादेव सरगर, संघटक सरचिटणीस दीपक माने, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, पूर्व मंडल अध्यक्ष दरीबा बंडगर, भूपाल सरगर, अतुल माने, श्रीकांत वाघमोडे, रविंद्र ढगे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, श्रीराम अलाकुंटे, दीपक मासाळ, संजय संकपाळ, ठोबरे, मामा, आदी मान्यवर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत