Breaking News

गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या संपुर्ण पदाधिकार्यांचे सामूहिक राजीनामे.

 गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या संपुर्ण पदाधिकार्यांचे सामूहिक राजीनामे.

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतीनिडी,संतोष मडावी,चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जितेंद्र सोनटक्के यांनी अफरातफर केल्याच्या कारणावरून समितीच्या मासिक बैठकीत त्यांना निलंबित केले.जवळपास दोन वर्षानंतर नागपूर विभागीय सह निबंधक यांनी सोनटक्के यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांना परत सचिव या पदावर रुजू करण्याचे आदेश दिलेत. त्यावर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी सभापती यांचेवर नाराजी व्यक्त करीत.

गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या संपुर्ण पदाधिकार्यांनी एकत्र जमून दि.२९ मे रविवारला सह्यानिशी सामुहिक राजिनामे देत सदर राजीनामे मंजूर करण्यात यावे याबाबत आमदार सुभाष धोटे कडे सह्यांचे अर्ज दाखल केले. एकावेळेस एकाच दिवशी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकारणी ने आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून येणाऱ्या जि. प. व प. स.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष धोटे यांना चांगलाच धक्का दिला आहे.यावरून तालुक्यात काँग्रेस चे दोन गट असल्याची सुध्धा चर्चा जोमात सुरू आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपीपरी येथील मागिल कालखंडात कार्यरत असलेले सचिव सोनटक्के यांनी सचिव पदाचा दुरुपयोग करून अनेक मार्गाने बाजार समितीची आर्थिक लूट केली. त्यामुळे समितीने १९-०७- २०१९ ला बाजार समितीच्या मासिक सभेत बहुमताने ठराव पास करून त्यांना बडतर्फ करण्यात आले.

मात्र नुकतेच सचिव सोनटक्के यांना विभागीय सहनिबंधक नागपूर यांनी सेवेत पूर्वरत घेण्यात यावे असे आदेश दिले. २९ मे ला घेण्यात आलेल्या तहकूब सभेत त्यांना सामावून घेण्यात आले.पुढील अपिल न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने रविवारला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना पूर्ववत सेवेत सामावून घेण्याचा ठराव पास करत सेवेत सामावून घेतल्याने कॉंग्रेस च्या गोटात गोंधळ सुरू झाला.

प्रतीवादी क्रमांक१ बाजार समितीने अपिलार्थी जितेंद्र सोनटक्के यांचे विरुद्ध खाते चौकशीचा दिनांक ५/११/२०२० जी चा आदेश आणि त्या अनुषंगाने चौकशी अधिकारी यांचा ३०/०१/२०२१ रोजीचा खाते चौकशी अहवाल निरस्त ठरल्याने तो रद्द केला परिणामी प्रतिवादी क्रमांक १ बाजार समितीने १९/०३/२०२१ रोजी सोनटक्के यांच्या बडतर्फी बाबत पारित केलेला आदेश रद्द करून त्यांना सेवेत पूर्व भारत सचिव पदावर रुजू करून घ्यावे व तसा अनुपालन अहवाल प्राधिकरणाकडे सादर करावे असा निकाल दिल्याने.या निर्णयाविरुद्ध बाजार समिती अपील घेत वरिष्ठ न्यायालयात न गेल्याने तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.

 कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरीत काँग्रेस पक्षाचे बहुमत असताना भ्रष्टाचार केल्याच्या कारणाने बडतर्फ करण्यात आलेल्या सचिव सोनटक्के यास पूर्ववत सेवेत सामावून घेणे ही बाब तालुक्यातील शेतकरी व व्यापारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची थट्टा करणारी आहे.

कॉंग्रेस पक्ष वाढीच्या आणि बाजार समितीच्या दृष्टीने हानीकारक व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनाला भिडणारी असल्यामुळे गोंडपीपरी तालुक्यातील सर्व कॉंग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांचेकडे सामूहिक राजीनाम्याचे स्वाक्षरीनिशी पत्र पाठवले. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूका तोंडावर असतानाच संपूर्ण कार्यकारणी ने राजीनामा दिल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकावर परिणाम होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबतच काँग्रेस च्याच काही लोकांवर काँग्रेसचेच पदाधिकारी यांनी अविश्वास दाखवीत दोन गट असल्याचे उघडपणे दाखवून दिल्याचे चित्र सध्यस्थितीत पाहायला मिळत आहे.

 जितेंद्र सोनटक्के यांचेवरील असलेले आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांना पूर्व पदावर सचिव म्हणून घेण्यात यावे असा आदेश विभागीय सहनिबंधक नागपूर यांनी दिला.आदेशाचे पालन करीत त्यांना सचिव पदावर घेण्यात आले. : सुरेश चौधरी.सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत