Breaking News

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

तीन चोरट्यांना अटक , 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी निरमाळे, लातूर :स्थानिक गुन्हे शाखा लातूर च्या पथकाने तीन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3 मोटर सायकल आणि एका मोटर सायकल चे सुटे भाग असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .या कारवाईमध्ये दोन गुन्हे उघड झाले आहेत.

पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन , लातूर शहर चे डीवायएसपी श्री जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे सपोनि राहुल बहुरे, सपोनि सचिन द्रोणाचार्य, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापटे, नवनाथ हसबे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख ,संतोष खांडेकर ,नकुल पाटील यांच्या पथकाने रेनापुर येथील,

 रहीम सुलेमान शेख वय 22 राहणार रेनापुर, बालाजी नागनाथ भोळे वय 35 राहणार रेनापुर, अमन उर्फ नोमान एजाज पठाण वय 21 राहणार रेनापुर या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3 मोटर सायकल, आणि साहित्य असा एकूण 1 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कार्यवाही मध्ये पोलीस स्टेशन रेणापूर येथील गुन्हा नंबर 163 /2022 कलम 379 भा द वि गुन्हा नंबर 203 /2022 कलम 379 भादवी हे गुन्हे उघडकीस आले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत