मस्तांशाह मस्जिद पासून ते नागझिरी पर्यंतचे रस्ता डांबरीकरण अतिशय निकृष्ठ दर्जाचे
रावेर येथे WBM इस्तीमेटप्रमाणे रस्ता डांबरीकरण नाही
मस्तांशाह मस्जिद पासून ते नागझिरी पर्यंतचे रस्ता डांबरीकरण अतिशय निकृष्ठ दर्जाचे
रस्त्याला साईड पट्टी देखील बिल्कुल नाही
ठेकेदाराकडून डांबरचा कमी अर्थात नावापुरता वापर
जनतेच्या पैशाची बोगस कामामुळे लुट
संबंधित अधिकारी मात्र कंत्राटदाराच्या खिशात
महा घडामोडी न्यूज विशेष प्रतिनिधी,दिपक तायडे,जळगांव ; रावेर येथे मस्तांशाह बाबा मस्जिद पासून ते नागझिरी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण घाईघाईने सुरू आहे या कामाकडे मुख्यअधिकारी न पा रावेर आणि बांधकाम अभियंता यांना निरीक्षण करायला वेळच नाही ,ते या कामावर लक्ष द्यायलाच तयार नाही त्यामुळे या रस्त्या चे डांबरीकरण करणारा ठेकेदार त्याच्या मनमानी प्रमाणे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार रावेर येथे सुरू आहे.
या रस्त्याने पुढे रसलपूर,अभोडा, कुसुम्बा, पाल आणि पुढे मध्यप्रदेश कडे जाणारा हा रस्ता असुन या रस्त्याने दररोज लहान मोठया जड, अवजड वाहनांची बसेसची ये जा दिवस भर सुरूच असते ,त्यामुळे सदरचे रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम लवकर खराब होऊन जनतेच्या पैशाचा चुराडा होईल यात शंकाच नाही.
हे रस्ता डांबरीकरणाचे निकृष्ठ दर्जाचे काम न पा रावेर येथील प्रशासनाने लक्ष वेधून त्वरीत बंद करावे अशी मागणी जोर धरत आहे आणि बोगस काम करणाऱ्यांना पुढे भविष्यात डांबरीकरणाचे काम देण्यात येणार नाही याची खबरदारी न पा रावेर ने घ्यावी असे चर्चेला उधाण रावेर शहरात आलेले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत