Breaking News

शालान्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

 शालान्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न. 

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर,वरोरा : "ज्येष्ठ नागरिक संघ (फेस्कॉम) वरोरा च्या वतीने वरोरा शहरातील सर्व माध्यमिक शाळांमधून, महाराष्ट्र राज्य शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च एप्रील २०२२ ला बसलेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ् यापैकी प्रत्येक शाळेतून - प्रथम व द्वितिय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हिरालाल लोया विद्यालयाची कु नंदिनी वसंतराव बरडे तालुक्यातून    


व वरोरा शहरातून प्रथम आणि चंद्रपूर जिल्ह्यातून द्वितिय ठरली . आहे. तिला ९७.४० टक्के गुण मिळाले आहेत. कु. रोशिका धगडी ही९६ टक्के गुण मिळवून शहरात द्वितिय ठरली आहे ती अरविंद विद्यानिकेतन (कॉन्व्हेन्ट) ची विद्यार्थीनी आहे. दिशा इनोव्हेटिव्ह लर्निंग स्कूलचा विद्यार्थी आर्यन अरूण लोडे ९५.६० टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांमधून हिरालाल लोया विद्यालयाची कु· मारीया अनम मुजाहिद हुसेन कुरेशी ८९.२० टक्के मिळवून प्रथम ठरली आहे. वरोरा शहरातील १४ शाळातील एकूण २९ गुणवंतांपैकी २१ मुली व ८ मुले आहेत. सर्वाना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आई, वडील, पालकांच्या साक्षीने 

पार पडलेल्या ह्या सोहळ्यात आनंदाचा महापूर उसळला होता. फेस्कामच्या पद्धतीनुसार साने गुरुजींच्या 'खरा तो एकचि धर्म' गीताचे गायन सौ. मीराबाई वानखेडे यांनी केले. प्रास्ताविकातून सचिव श्री मगरे यांनी संघाचे धोरण, उपक्रम, कार्यक्रमाचे नियोजन ह्याविषयी सविस्तर सांगितले. ज्येष्टांसाठी मोफत आरोग्य तपासणी आयोजिण्यात आली होती.वेलनेस सेंटर चे आरोग्य प्रशिक्षक व तज्ञ श्री. किशोर सालुरकर, नांदेड, सौ. सीमा देवतळे, मुंबई कु. कांचन चौधरी यांनी आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व निरामय आरोग्यासाठी आवश्यक सल्ला दिला. एकूण १५० ज्येष्ठ सदस्यांनी याचा लाभ घेतला.

संघातर्फे प्रत्येक महिन्यात ज्येष्ठ संघ सदस्यांचा सामुहिक वाढदिवस सोहळा साजरा केल्या जातो. जून महिन्यातील १५ सदस्यांचा शाल व आरोग्यनिधी (पुस्तिका), पुष्पगुच्छ देऊन सहपरिवार सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांचे पालक, वाढदिवसाचे मानकरी सदस्य ह्यांनी मनोगत व्यक्त करताना - गुणवंत विद्यार्थ्यांना यशाबद्दल अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या, संघाच्या उपक्रमांचे कौतुक केले, प्रोत्साहन दिले.

ज्येष्ठतम सदस्य, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक श्री. गौस महंमद ईसाक शेख प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना शिक्षकाच्या जीवनात विद्यार्थ्यांचा सत्कार होतांना अत्यानंद होतो. तो आज मला अनुभवास येतो आहे. संघ कार्यकर्त्यांच्या या कार्यक्रमास शुभेच्छा व प्रोत्साहन दिले. अध्यक्षीय भाषणातून श्री. सोनेकर यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे आई वडील, पालक ह्यांचे अभिनंदन, संपादित यशाबद्दल प्रशंसा आणि भविष्यातही यशाचे शिखर गाठण्यासाठी सल्ला व शुभेच्छा दिल्या. सर्व संघ सदस्यांनी आरोग्य सुद्रुढ ठेवण्यासाठी योग्य काळजी घेण्याचे सांगितले, आभारप्रदर्शन श्री. स. रा.माहुरे त्यांनी केले. यशस्वी नियोजन व विशेष परीश्रमाबद्दल सचिव श्री. मगरे व उपाध्यक्ष श्री. ल. शा. पराते यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन उत्तम रितीने श्री. शा. मा. धवने यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांनी खूप परिश्रम घेतले. अंबादेवी देवस्थान,खांजी वार्ड,वरोरा येथे पार पडलेल्या आनंदाच्या या मेळाव्याची सांगता सुरुचि स्नेहभोजनाने झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत