Breaking News

राष्ट्रीय पर्यावरण मिञ बहुउद्देशीय संस्था भारतचा चतुर्थ वर्धापन दिन समारोह उत्साहात संपन्न

राष्ट्रीय पर्यावरण मिञ बहुउद्देशीय संस्था भारतचा चतुर्थ वर्धापन दिन समारोह उत्साहात संपन्न


महा घडामोडी न्युज नेटवर्क,अहमदनगर : पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय पर्यावरण मिञ बहुउद्देशीय संस्था भारतचा चतुर्थ वर्धापन दिन समारोह राळेगणसिद्धी. जि. अहमदनगर येथे उत्साहात संपन्न झाला. दि. 4 व 5 जून रोजी दोन दिवस संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळयात पर्यावरण मिञ बहुउद्देशीय संस्था भारत आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष, मा. आदि- सुनिताताई तुकाराम गेंगजे. यांना " राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार 2022 " सन्मानित करण्यात आला. हा पुरस्कार जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत , पर्यावरण मिञ बहुउद्देशीय संस्था भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक श्री. देवा तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

या दोन दिवशीय कार्यक्रमात पद्मभूषण अण्णा हजारे,मा. श्री. दिपकजी काळे ,(राष्ट्रीय सचिव पर्यावरण मिञ बहुउद्देशीय संस्था भारत) माजी आयुक्त तसेच जलसंधारण सचिव श्री. प्रभाकर देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. विठ्ठल शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते विश्व वारकरी सेनेचे ह.भ.प . पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, माजी सभापती पंचायत समिती खटावचे श्री.संदिप मांडवे,ग्रीन सोशियल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.अनुराधा देशमुख, सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. प्रियाताई शिंदे, सामाजिक कार्यकर्त्यां सौ.अरूणाताई बर्गे तसेच पर्यावरण मिञ बहुउद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री.रमेश शेंडे, राज्य संघटक श्री.गोकुळ देवरे , 

सांप्रदाय विभाग अध्यक्षा ह.भ.प.सौ. पुनमताई जाचक, तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य नियोजन समिती पदाधिकारी, संस्थेचे राज्यस्थान राज्य अध्यक्ष श्री. मुलाराम बाणा, छत्तीसगढ राज्य सचिव श्री. महेश कुमार साहू तसेच देशातील संस्थेचे तालुके, जिल्हे, राज्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. आदि - सुनिताताई तुकाराम गेंगजे यांना "राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार "2022 हा पुरस्कार, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक आदरणीय श्री. देवा तांबे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपली जबाबदारी नक्कीच वाढली आहे असे मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत