नेत्रदान श्रेष्ठदान
नेत्रदान श्रेष्ठदान
माणवी जिवनमाण जगण्यासाठी व ते पहाण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी अनमोल देणगी म्हणजे शरिरातील म्हत्वाचा अवयव डोळा आहे.डोळया मुळे आज आपण या सृष्टीतील निसर्गाने तयार केलेले प्रत्येक ठिकाण सौंदर्य आपणास पाहयला मिळते.वृध्द,तरूण मुले,मुली,की ज्यांना एखाद्या अपघाता झाला आणी आपली दृष्टी गमवावी लागली आहे किंवा अनेक मुले मुली जन्मजात अंध आहेत.त्यांना ही वाटते आपण या निसर्गाचे सौंदर्य कधीतरी स्वताच्या डोळयांना पहायला मिळेल...!
पण डोळयांची दृष्टी गेल्याने त्यांना हे सर्व करता येत नाही.निसर्गाच्या या अनमोल सौंदर्याचा आनंद अनुभव घेता येत नाही.अशाच काही गरजु मुला मुलींना पुन्हा त्यांना देखील निसर्गाचे सौंदर्य पहाता यावे यासाठी समाजातील इतर व्यक्तींनी गरजु मुला मुलींना नागरीकांना मृत्युनंतर आपले नेत्रदान करून मदत करावी यासाठी समाजात जनजागृती व्हावी म्हणुन जागतिक दृष्टिदान दिन 10 जुन रोजी साजरा केला जातो.समाजात नागरीकांमध्ये नेत्रदान याविषयी जागृती निर्माण व्हावी,नागरीकांना नेत्रदानाचे महत्व पटवून द्यावे.
समाजात अनेक गरजु मुले मुली आहेत ज्यांना डोळे नाहीत अशा अंध मुलामुलींना पुन्हा हे जग पाहण्याची संधी प्राप्त व्हावी त्यांना देखील या निसर्गाचे सौंदर्य अनुभव घेता यावे.
आपल्या डोळयांनी ही सुंदर सृष्टी बघता यावी.यासाठी समाजातील इतर व्यक्तींनी अशा गरजु मुला मुलींना आपल्या मृत्युनंतर आपले नेत्र दान करून मदत करावी.आपण नेत्रदान का करायला हवे याची आवश्यकता किती आहे..?आणि किती आहे. हे लोकांना समजावून सांगून जनतेला नेत्रदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जावे.आपण एखाद्या अंध व्यक्तीला आपले डोळे दान करून कसे त्याच्या अंधारमय जीवणात प्रकाश निर्माण करू शकतो याची जाणीव विविध कार्यक्रम उपक्रम राबवून लोकांना माहीती दिली जावे.
हे कार्य करण्यासाठी आज समाजात उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर यांच्या सह अनेक संस्था संघटना काम करत असतात.उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालयात आय बंँकेमध्ये ची ही सुविधा आहे व अनेक नागरीकांनी नेत्रदान समंधी नेत्रदानासाठी आपल्या नावाची नोंदणी करून घेतले आहेत. जेव्हा आपला मृत्यु होतो तेव्हा किमाण पाच ते सहा तासा च्या आत माहीती आयबँक मध्ये कळवावी लागते.त्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली जाते.समाजात हजारो नागरीक मरण पावतात त्यातील प्रत्येकाने जर मृत्युपुर्वी नेत्रदानासाठी आपली नाव नोंदणी केली आणि मरणानंतर आपले डोळे एखाद्या अंध गरजु व्यक्तीला दिले तर अंधारामध्ये जीवन जगत असलेल्या अनेकांच्या जीवनमाणात प्रकाश निर्माण होईल.
व त्यांच्या जीवणात प्रकाश मिळेल. कोणतीही व्यक्ती आपले डोळे दान करु शकते.यासाठी वयाचे देखील कुठलेच बंधन नसते.तर एखाद्या व्यक्ती गंभीर आजार आहे (एडस) असेल किंवा रक्तातील आजार असेल अशी व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही. आज देशात देखील नेत्रदान करत असलेल्या व्यक्तींची संख्या खुप कमी दिसुन येते.लोकांमध्ये नेत्रदानाविषयी पाहिजे तेवढी सामाजिक जनजागृकता निर्माण झालेली नाही.
नागरीकांना अजुनही नेत्रदानाचे महत्व समजलेले नाही.नेत्रदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे हे नागरीकांनी मान्य करत आहेत की नाहीत हा पण विचार करण्याचा विषय आहे.नेत्रदान या मोहीमेला पाहिजे तसा प्रतिसाद नागरीकांकडुन अजुनही मिळताना दिसून येत नाही.कदाचित हेच कारण आहे की नागरीकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी समाजातील नागरीकांनी निसंकोच नेत्रदान करावे असे अव्हाण उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीरचे अध्यक्ष डाॅ.रामप्रसाद लखोटीया यांनी केले आहे.
लिखाण : गणेश मुंडे पत्रकार



कोणत्याही टिप्पण्या नाहीत