Breaking News

शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी स्वागत दिवस म्हणून उत्साहात साजरा

 शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी स्वागत दिवस म्हणून उत्साहात साजरा

सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट चा नावीन्यपूर्ण उपक्रम

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,संतोष रोकडे,अर्जुनी मोर : गतवर्षी पासून कोरोना मुळे विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावं लागलं त्यामुळे शाळेतील वातावरण हे विद्यार्थ्यांना मिळाला नव्हता पण यावर्षी प्रत्येक मुलाला शाळेत प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली त्यामुळे विद्यार्थी हे आनंदात शाळेत येऊ लागले.यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष शैक्षणिक वातावरण मिळावे शालेय जीवनाचा आनंद उपभोगता यावा म्हणून स्थानिक श्रीमती केसरबाई शिक्षण संस्था द्वारा संचालित सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट व जी एम बी इंग्लिश मिडीयम हाय.यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत शाळेचा या सत्राचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या स्वागत दिवसाने करण्यात आला.

1111111111

त्यासाठी वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पित कापून शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून शव्या जैन,प्रमुख अतिथी पर्यवेक्षक मुकेश शेंडे यांच्या उपस्थितीत होते उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन व आभार ज्ञानेश्र्वर रोकडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक प्रमुख अविनाश मेश्राम,स्नेहा चौहान,श्रद्धा कापगते,पल्लवी वाघ,रजनी गुळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत