Breaking News

सेलू नगर परिषदच्या चुकीच्या कारभारामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे साखळी लाक्षणिक उपोषण इशारा

 सेलू नगर परिषदच्या चुकीच्या कारभारामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे साखळी लाक्षणिक उपोषण इशारा

मतदान प्रारूप याद्यामध्ये घोळ भाजपाचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे,सेलू : सेलू नगरपरिषद निवडणुकीच्या प्राश्व भूमीवर प्रभागाच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र त्या याद्यामध्ये घोळझाला असल्याने भारतीय जनता पार्टी सेलू च्या वतीनेआज 28जून रोजी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

निवेदनात म्हटलें आहे कि नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागाच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आली आहेत.सदर सर्व 1ते 13 प्रभागाचा प्रारूप याद्या या दोषपूर्ण असून यात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक आहे.मनमानी बेजबाबदाऱपणा वरिष्ठचे आदेश व मार्गदर्शक तत्वाचे उलघन करून या सर्व प्रभागाच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.याबाबत वेळोवेळी तालुका निवडनुक अधिकारी, मुख्यधिकारी यांना सर्व बाबी संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे.

जाणीवपूर्वक व हेतुत संबंधित निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी खोडसाळ पणा करत आहेत कर्तव्यात कसूर करत आहेत.राजकीय दबावात वागत आहेत.आपणास निवेदन देण्यात येतेकी आपण याप्रकरणी व्यक्तिश लक्ष घालून वस्तुनिष्ठ प्रभाग रचना नुसारच प्रभागाच्या प्रारूप याद्या करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात यावे जर अंतिम याद्या मध्ये दुरुसती करण्यात आली नाही.तर दिनांक 4जुलै 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षनिक साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा हि या निवेदनातुन देण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत