वाघाच्या हल्ल्यात इसम ठार, जंगलात शौचालयास बसणे पडले महागात
वाघाच्या हल्ल्यात इसम ठार, जंगलात शौचालयास बसणे पडले महागात
तुंबडी मेंढा जंगलातील घटना
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,संतोष मडावी, चंद्रपूर : डिझेल आणायला जात असतांना वाटेत शौचालयात बसलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज उघडकीस आली दिनांक 28 जूनला अड्याळला शेतात टॅक्टर सुरु असल्या मुळे भगवानपुर येथील इसम ताराचंद चंदनखेडे, हा ब्रह्मपुरी येथे डिझेल आणायला जात असताना,
वाटेत तुंबडी मेंढा जंगलात शौचालयास बसलेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून इसमास ठार केले व मृतदेह फरफटत नेले . हात, व डोके धळावेगळया अवस्थेत काही लोकांना 29 जूनला पहाटेच्या सुमारास दिसून आले,सदर घटनेची माहीती ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती मिळताच वनपरीक्षेत्र आधिकारी यांच्या टिमने मौका चौकशी केली व शवविच्छेदनासाठी ब्रम्हपूरी येथे पाठविण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत