Breaking News

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा

 अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा 

 जिल्ह्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे, अर्जुनी/मोर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियपनामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे गेल्या तीन चार वर्षापासुन केशोरी ते गोठणगाव,केशोरी ते सिरोली/महागाव,केशोरी ते खोळदा(पंतप्रधान ग्राम सडक), महागाव ते खामखुरा आणि सिरोली ते मोरगाव या आदीवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील रस्ते अपघातांना आमत्रंण देत आहेत केशोरी ते सिरोली,महागाव ते खामखुरा हे दोन्ही रस्ते स्वातंत्र्यापुर्वीचाच अनुभव देत आहेत.

 या सर्व खड्डेमय व अपघाताला आमंत्रण देणाऱ्या रस्त्यांचे त्वरीत डांबरीकरण करुन वाहनचालकांना होणाऱ्या त्रासापासुन दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. महागाव ते खामखुरा,केशोरी ते सिरोली,केशोरी ते खोळदा जिल्हा सिमे पर्यंत,सिरोली ते मोरगाव, केशोरी ते गोठणगाव, अर्जुनी ते बायपास तावशी तसेच ईटखेडा ते वडेगाव पुयार तसेच खामखूरा ते येगाव जाणवा तसेच अर्जुनी/मोर तालुक्यातील अनेक मुख्य मार्गांची तसेच गाव अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे.

 गेल्या तिन चार वर्षापुर्वी डांबरीकरन झालेल्या या रस्त्यांवरुन आता डांबर गायब झाले आहे या मार्गावर लांबच लांब खोल आणि मोठ मोठे खड्डे पडले आहेत दिवसाढवळ्या या रस्त्यांवरुन प्रवास करतांना येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत धरुन मार्ग शोधावा लागतोय.एखादा वेळेस आपतकालीन रुग्ण बाहेर घेऊन जायचे असल्यास रुग्णाचा रस्ते वाटेतच मृत्यु होण्याची शक्यता आहे या रस्त्यावर वाहनचालक आणि पादचाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो.

या मार्गांनी या भागाचे आमदार, खासदार, आणि अधिकारी ये - जा करतात परंतु त्यांना या रस्त्यांची दुर्दशा दिसत नाहीत काय?असा सवाल नागरिकांनी केला आहे. गेल्या तीन चार वर्षापासुन तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा व अखेरची घरघर लागली असुन जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अंभियंते अब्दुल जावेद यांच्या निष्क्रिय कारभारामुळे रस्त्यांचे कामे रखडलेली आहेत .केशोरी ते सिरोली मार्गे मोरगाव पर्यंत रस्त्यांचे टेंडर रद्द झाले असुन आता पुन्हा नव्याने नविन अंदाजपत्रक प्रस्ताव उपविभागीय अभियंता प्रकाश लांजेवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केलेले असुन या कामांना पुन्हा सहा महिन्याचा कालावधि लागणार हे मात्र निश्चित आहे. 

अशा निष्क्रिय व कामचुकार अधिकाऱ्यांमुळे अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्ते हे देशविकासात व दळनवळनासाठी महत्वाची भुमिका आहे मात्र जिल्ह्याचे बांधकाम विभागच कुंभकर्णी झोपेत असुन या विषयाला हरताळ फासला आहे. या रस्त्यांवरून प्रवास करताना अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत तालुक्यातील ग्रामीण भागातील या सर्व खड्डेमय रस्त्यांचे त्वरीत डांबरीकरन करुन नक्षलग्रस्त भागाच्या विकासाला गती देत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी अर्जुनी/मोरगाव तालुकावाशीयांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत