जीवाची बाजी लावून धावत्या रेल्वेतून सिमेंट व कोळशाची तस्करी
जीवाची बाजी लावून धावत्या रेल्वेतून सिमेंट व कोळशाची तस्करी
रेल्वे पोलीस तस्करासमोर हतबल
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, राजुरा : वेकोली परिक्षेत्रात कोळसा चोरी करणे कठीण होत चालण्याने आता कोळसा तस्कराणी आता आपला मोर्चा रेल्वे कडे वळवला आहे जीवाची बाजी लावत धावत्या रेल्वेतून कोळसा व सिमेंट चोरल्या जात असल्याचा धव्कादायक प्रकार समोर येत आहे मात्र संबंधित रेल्वे पोलिस फोर्स कडुन याकडे दुर्लक्ष केले जात आहे
राजुरा तालुका औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते उत्पादनाच्या निर्यातीसाठी तालुक्यातील सिमेंट कंपन्या मधुन सिमेंटच्या बॅग तसेच कोळसा खाणीतून कोळसा हा रेल्वे मार्फत देशातील विविध भागात पोहचवला जातो, गडचांदुर, चंदनवाही,कुकुडसात,खामोना, गौरी, मात्रा, आर्वी, राजुरा सोमनाथपुर, शिवाजी कालेज,चुनाळा, माणिकगड असा रेल्वे रुट आहे रेल्वे क्राॅसिग गेट असल्याने बरेचदा कोळसा व सिमेंट भरलेल्या मालगाड्या ह्या क्राॅसिग नजीक येऊन सिग्नल च्या प्रतिक्षेत रेल्वे मंदगती होतात जीवाची बाजी लावत चोरटे धावत्या रेल्वेतून सिमेंटच्या बॅगा व कोळसा रेल्वे च्य वॅगन मधून चोरी करीत असल्याचे उघडकीस होत आहे मात्र याकडे रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नागरीकाकडुन संशय व्यक्त केला जात आहे
बल्लारपूर, राजुरा माणिकगड खामोना आर्वी गडचांदुर गौरी पवनी साखरी कुकुडसात चंदनवाही सास्ती मात्रा या भागातील तब्बल ६०/७०-तस्कर या व्यवसायात उतरले असुन आता हे लाखोपतीच्या पंगतीत बसले असल्याचे बोलल्या जात आहे तस्करीचा कोळसा चंद्रपूर येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला विक्री करीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे रोज राष्ट्रीय संपत्ती चोरली जात रेल्वे प्रशासनाला लाखोंचा फटका बसतोय मात्र यावर अंकुश लावण्यासाठी कोणताही दबंग अधिकारी समोर येत नसल्याने हे तस्कर चांगलेच फोफावली असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
तस्करी बहुतांशी रात्रीच्या वेळेस आणि सोयी नुसार दिवसाढवळ्या पण हा कोळसा व सिमेंट बॅगा उतरवल्या जातो गडचांदुर ते माणिकगड असा रेल्वे रुट असुन बाजुस जागोजागी प्यास्टीक पन्नीत कोळसाचे ढिगारे साठवून असल्याचे निदर्शनास येत आहे सुरू असलेला प्रकार सर्वसामान्यांना दिसून येत आहे मात्र याची कल्पना रेल्वे प्रशासनाला नाही यावर विश्वास बसणे कठिणच असुन रेल्वेचे कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या संगांमताशिवाय ही चोरी अशक्य आहे असे नागरीकांमध्ये बोलल्या जात आहे.
जीवाची बाजी लावत चालत्या रेल्वेतून तस्करी करणे हे मुत्युला आमंत्रण असुन कोणत्याही क्षणी अनुचित घटना घडुन मोठा अनर्थ होण्याची शक्यता वाढलीय कोळसा तसकरांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पाहण्यात आले आहे त्यामुले पोलीस प्रशासनाने तात्काळ ह्यात लक्ष घालून सदर कोळसा चोरी थांबवावी व राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात असून रेल्वे प्रशासनाने ही ह्यात लक्ष घालावे अशी अपेक्षाही शहरातील जवाबदार नागरिक व्यक्त करित आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत