पंचायत समिती सावली येथे मोठ्या उत्साहात कृषी दिन केला साजरा
पंचायत समिती सावली येथे मोठ्या उत्साहात कृषी दिन केला साजरा
महा घडामोडी न्युज नेटवर्क,सावली : पंचायत समिती सावली येथे कृषी दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत 1 जुलै हा दिवस राज्यात 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांची मोलाची कामगिरी होती.म्हणुनचं त्याना हरितक्रांतीचे प्रणेते संबोधले जाते. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना चे तांत्रिक सहाय्यक राऊत यांनी प्रास्ताविकेतुन त्यांच्या संपूर्ण जिवन कार्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाला उपस्थित माजी सभापती विजय कोरेवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय पंचायत समिती सावलीचे गट विकास अधिकारी मरसकोल्हे मॅडमनी पंचायत समिती कृषी विभागाच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध योजनांची माहिती देत विविध योजनांचा लाभ शेतकरी वर्गानी घेऊन जिवनात आमुलाग्र बदल घडवावे व सुजलाम सुफलाम व्हावं असं आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी यांनी सुद्धा मोलाचं मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी यांनी केले.यावेळी आदरणीय गट विकास अधिकारी मरसकोल्हे मॅडम,माजी सभापती विजय कोरेवार साहेब,तालुका कृषी अधिकारी गोडसे मॅडम,कृषी अधिकारी आडे साहेब, बहुसंख्य शेतकरी बांधव तथा पंचायत समिती अधिकारी,पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत