Breaking News

ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे डॉक्टर्स डे साजरा

 ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे डॉक्टर्स डे साजरा

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,शिवाजी निरमनाळे, लातूर : दिनांक 4 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे डॉक्टर साठी साजरा करण्यात आला. दिनांक एक जुलै हा जागतिक डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो, त्या दिवसाच्ये औचित साधून कोविड च्या लाटेमध्ये रुग्णसेवा दिलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला, हा कार्यक्रम वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर मीरा चिंचोलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

या कार्यक्रमाची प्रस्तावना दंतशल्य चिकित्सक डॉ. अरुण बालकुंदे यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जितेन जैस्वाल यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले, यानंतर कोविड-19 च्या लाटेत रुग्णसेवा दिल्याबद्दल डॉ जितेन जैस्वाल सर ,डॉ. अरुण बालकुंदे,डॉ. प्रशांत अंभोरे, डॉ रंजीता शिसोदे, डॉ.आयेशा शेख यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथील सर्व स्टाफ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत