महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांचां अतिवृष्टी व पूर पाहणी दौरा
राजुरा तालुक्यातील विहीरगाव मूर्ती नलफडी सिंधी धानोरा विरूर स्टेशन इत्यादी गावात पूर पाहणी
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी,प्रवीण चिडे,विरुर स्टे. : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांचां अतिवृष्टी व पूर पाहणी दौरा राजुरा तालुक्यातील विहीरगाव मूर्ती नलफडी सिंधी धानोरा विरूर स्टेशन इत्यादी गावात पूर पाहणी दौरा करण्यात आला व पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन माझ्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी विधानसभेत आवाज उठवणार व राजुरा तालुका अतिवृष्टी म्हणून घोषित करावी अशी मागणी लावून
धरणार व या शिंदे सरकारला मदत करण्यास व अतिवृष्टी घोषित करण्यास भाग पाडू असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले त्यावेळी माननीय लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर माननीय आमदार सुभाष भाऊ धोटे माननीय आमदार वंजारी साहेब जिल्हा अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे तालुका अध्यक्ष रंजन लांडे माजी सभापती कुंदाताई जेनेकर आबाजी पाटील ढोमणे भाग्यश्री आत्राम सरपंच विरुर स्टेशन अजय रेड्डी अखेर साहेब ज्ञानेश्वर तुराणकर इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते व या परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामवासी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत