गणेशपुर येथील सार्वजनिक विहिरीत आढळला मृतदेह
गणेशपुर येथील सार्वजनिक विहिरीत आढळला मृतदेह
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,भंडारा : भंडारा शहरापासून जवळच असलेल्या ग्राम गणेशपुर येथील सार्वजनिक विहिरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली धर्मचंद्र येरपुडे असे मृतकाचे नाव आहे याबद्दल सविस्तर वृत्त असे की
भंडारा शहरापासून जवळच असलेल्या ग्राम गणेशपुर येथे असलेल्या विहिरीमध्ये आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास स्थानिक नागरिकांना मृतदेह असल्याची माहिती मिळाली याची माहिती तात्काळ नागरिकांनी जनसेवक पवन मस्के यांना दिली. लागलीच घटनेची माहिती जनसेवक पवन मस्के यांनी पोलीस विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दिली.
भविष्यात या प्रकारच्या घटना घडु नये यासाठी विहिरीला कठळे बांधण्याची मागणी जनसेवक पवन मस्के यांनी केली आहे. गणेशपुर परिसरामध्ये अनेक विहरी असून त्यांना कठडे नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सगळ्या विहिरींवर कठडे तात्काळ बांधून देण्यात यावे तसेच ग्रामपंचायत तर्फे जाळी लावण्यात यावी असे स्पष्ट मत पवन मस्के आणि व्यक्त केले आहेत..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत