भिंत कोसळून वृद्ध इसमाचा मृत्यू
भिंत कोसळून वृद्ध इसमाचा मृत्यू
ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथील घटना
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशातच काल आलेल्या पावसामुळे पिंपळगाव भोसले येथील माजी ग्राम पंचायत सदस्याच्या घराची भिंत कोसळून वृद्ध इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली. रामचंद्र गायधने असे मृतकाचे नाव आहे.
स्वातंत्र दिनी पिंपळगाव भोसले येथील शिवाजी चौकात राहणारे माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर गायधने यांनी रात्री सहकुटुंब जेवण केले जेवणानंतर वडील रामचंद्र गायधने हे झोपले असता अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळल्याने रामचंद्र गायधने यांचा दबून मृत्यू झाला. शेजाऱ्यांनि मृतदेह बाहेर काढले .घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करीत ब्रम्हपुरी ला हलविले . रामचंद्र गायधने यांच्या दुर्दैवी मृत्यूने पिंपळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत