Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवास पारनेर तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा

 स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवास पारनेर तालुक्यात मोठ्या उत्साहाने सुरवात झाली असुन शनिवारी सर्व शासकीय निमशासकिय कार्यालयासह शाळा विद्यालये व घरोघरी तिंरगे ध्वज फडकले.

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दत्ता ठूबे,पारनेर : स्वातंत्र्यया आमृत मोहत्सवा निमित्ताने हर घर तिंरगा ध्वज या अभियानास शनिवारी ध्वजवदनाने सुरवात झाली तालुक्यातील गावा गावात वाडी वस्तीवर अदिवासी पाड्यावर तिंरगा ध्वज फडकले,अनेक ठिकाणी तिंरगा मोटारसायकल राँली काढण्यात आली तर काही ठिकाणी तिंरगा ध्वजाजी अंखड मिरवणूक काढण्यात आली . दवाखाने दुकाने व्यापारी संकुले वहनावर तिंरगे ध्वज दिसत होते,तर अनेक ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालये ऐतिहासिक वेशी वर तिरंगा रंगाची विद्युत रोषनाई करण्यात आली, तालुक्यात अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीताच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा व आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत, तर काही ठिकाणी जनावरांच्या आरोग्य तपासण्या केल्या जात आहे,

 शनिवारी दि १३ ते १५ आँगस्ट या काळात रोज ध्वजारोहन केले जाणार आसल्याने व घरोघरी तिंरगे ध्वज फडकवले जात आसल्याने संपुर्णे गावे तिंरगे मय झाले आहेत .शाळा विद्यालयेही स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत या काळात शाळात विविध स्पर्धासह झांज व लेझीम पथके विविध कवायती करताना दिसत आहेत . पारनेर तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाला मोठ्या दिमाखात सुरवात झाली असुन संपुर्ण तालुका तिंरगामय झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत