Breaking News

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्राम गणेशपुर येथे कार्यक्रम संपन्न

 आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्राम गणेशपुर येथे कार्यक्रम संपन्न

जनसेवक पवन मस्के यांची प्रमुख उपस्थिती

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, भंडारा : ७५  व्या आजादीच्या अमृत महोत्सव निमित्त असून ‘देशभक्तीपर जनजागृती’ कार्यक्रम करण्यात आली आहे. प्रत्यक्ष हा कार्यक्रम आज ग्राम गणेशपुर येथे राबविण्यात येत आहे. या वर्षीचा स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या गौरवाचा इतिहास सांगणारा असल्याने तो मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन सर्व स्तरातून होत असताना भंडारा शहरापासून जवळच असलेल्या ग्राम गणेशपूर येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 कार्यक्रमांमध्ये भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव पवन मस्के हे प्रामुख्याने उपस्थित होते नागरिकांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत व्हावी हा महत्त्वाचा उद्देश घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून जनतेला एक संदेश देण्याचे काम करण्यात आले यावेळी नाटिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.नाट्यरूप करणारे नाट्य कलाकार सुरेंद्र कुलरकर अश्विनी ढवळे सुषमा बावनकर पियुष ढवळे कुलदीप मेश्राम आदीने मोठा श्रम घेतलेला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत