Breaking News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ममता डुकरे व घनश्याम डुकरे यांनी घेतला भाजप प्रवेश

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ममता डुकरे व घनश्याम डुकरे यांनी घेतला भाजप प्रवेश 

कांग्रेसला पडले खिंडार भाजपला मिळाली बळकटी

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून केला प्रवेश

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, राजू शर्मा, चिमूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चिमूर येथील शहीद दिन सोहळा कार्यक्रम प्रसंगी आले असता आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नवीन वाड्यात भिसी येथील माजी जीप सदस्य ममता डुकरे व घनश्याम डुकरे व हर्षल डुकरे यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून भाजप मध्ये प्रवेश केला. कांग्रेस ला खिंडार पडले असून भाजप बळकटी मिळाली. 

     माजी जीप सदस्य सौ ममता डुकरे, सहकार नेते घनश्याम डुकरे यांचे भीसी व तालुक्यात कांग्रेस च्या माध्यमातून प्रस्थ होते.परंतु कांग्रेस च्या गटबाजी ला कंटाळून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या विकास कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून डुकरे दापत्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. 

यावेळी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ देवराव होळी आमदार कृष्णा गजभे,माजी आमदार मितेशजी भांगडीया, माजी आमदार सुधीर पारवे,माजी आमदार संजय धोटे, भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर डॉ श्यामजी हटवादे, ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री जुनेद खान जितेंद्र मोटघरे माजी नगरसेवक सतीश जाधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत