समता नगर येथे भक्ती विजय ग्रंथाची सांगता व महाप्रसाद चे आयोजन
समता नगर येथे भक्ती विजय ग्रंथाची सांगता व महाप्रसाद चे आयोजन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : दि 28 सप्टेंबर बुधवार रोजी समतानगर श्रीराम भजणी मंडळ आयोजित भक्ती विजय ग्रंथाची सांगता निमित्य ह भ प भीमाशंकर महाराज एरंडेश्वरकर यांचे किर्तन झाले. भक्ती विजय ग्रंथाचे वाचन गिरी महाराज मानोलीकर यांनी केले ह भ प भीमाशंकर गुरूजी एरंडेश्वरकर यांनी भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारूनी या अभंगावर निरूपण केले.
या प्रसंगी भगवान महाराज बोरूळ, विठ्ठल महाराज सायखेडकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, आकात महाराज, माऊरी महाराज काष्टे , गुलाबराव लहाणे , शेषराव बुधवंत, आदिंची प्रमुख उपस्थिती होती. मृदंगचार्य कृष्णा महाराज जाधव गायनाचार्य बबन महाराज पालवे,माऊली महाराज खवणे,मदन मानवतकर, गीरी महाराज, लक्ष्मण जाधव, डाॅ विलास घुगे, भास्करराव काकडे, ज्ञानोबा गोरे, भगवान शिंदे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यश्वतेसाठी अनिकेत शिंदे, गणेश काष्टे, नाना काष्टे, गोविंद आबुज, राजकुमार वखरे,किरण ठाकरे,प्रितम बनसोडे, शिंदे, आदिनी परिश्रम घेतले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत