Breaking News

केंद्रस्तरीय खेळामध्ये भारतीय आदिवासी आश्रम शाळा शिरेगाव बांध चे सुयश

 केंद्रस्तरीय खेळामध्ये भारतीय आदिवासी आश्रम शाळा शिरेगाव बांध चे सुयश

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,संतोष रोकडे, अर्जुनी मोर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत शासकीय आदिवासी आश्रम शाळा शेंडा येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित भारतीय आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा सिरेगाव बांध च्या विद्यार्थ्यांनी कबड्डी खेळासह विविध स्पर्धेत प्रथम क्रमांकासह घवघवीत यश प्राप्त केले आहे.


        एकात्मिक आदिवासी प्रकल्प देवरी अंतर्गत शेंडा येथे आदिवासी आश्रम शाळांच्या विविध स्पर्धांचे आयोजन 22 ते 24 सप्टेंबर पर्यंत करण्यात आले होते. यामध्ये भारतीय आदिवासी आश्रम शाळा शिरेगाव बांध येथील एकूण 82 विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये भाग घेतला होता. यामध्ये 43 विद्यार्थ्यांचा प्रकल्प स्तरीय खेळामध्ये निवड करण्यात आली. 

यामध्ये अठरा वर्ष वयोगटात कबड्डी स्पर्धेत मुलींनी प्रथम क्रमांक पटकाविला तर 16 वर्ष वयोगटात  कबड्डी स्पर्धेत मुलांनी प्रथम क्रमांक तर 19 वर्ष वयोगटात कबड्डी स्पर्धेत मुलांनी प्रथम क्रमांक पटकाविला 16 वर्षीय वयोगटात व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांनी द्वितीय क्रमांक तर 19 वर्ष वयोगटात कबड्डी व खो-खो मध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक पटकाविला ,तसेच वैयक्तिक खेळामध्ये 19 वर्ष वयोगटात शिवनाथ नीलाराम मडावी यांनी 3000 मीटर रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक

 तर 16 वर्ष वयोगटात कुमारी युमलेस पनेस मडावी 800 मीटर रनिंग मध्ये प्रथम तर 16 वर्ष वयोगटात पंकज प्रभु वरठे 100 मीटर रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व विजय चमूचे तसेच क्रीडा शिक्षक ,शिक्षिका यांचे संस्था अध्यक्ष चामेश्वर गाहाणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. एम .लोथे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यू .पी .खुणे यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत