Breaking News

न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

 न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न, भुसावळतील घटनेने खळबळ

महा घडामोडी न्युज जिल्हा विशेष प्रतिनिधी, चेतन तायडे, जळगाव : भुसावळातील अडीच वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊनही त्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्याला मिळालेले नाही याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला ही घटना भुसावल न्यायालयात आवारात आज दिनांक 17 दुपारच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बोदवड तालुक्यातील धोनखेडा येथील शेतकरी दयाराम गोविंदा सोनसकर यांच्या जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तरीदेखील गेल्या अडीच वर्षापासून भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्याने दयाराम सोनस्कर यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता.

 मात्र प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने त्यांनी भुसावल न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र वेळीच शहर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला दयाराम सूनस्कर यांनी भुसावळ न्यायाधीश यांना याआधीच पत्र दिले होते याद्वारे त्यांनी कळविले होते की मला भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे भुसावळ न्यायालयाच्या आवारात 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता याला सरकार जबाबदार राहील असे पत्रात म्हटले होते त्या अनुषंगाने न्यायाधीशानी सदरील बाब भुसावळ शहर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दयाराम सोनस्कर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत