Breaking News

शिवसेना महिला आघाडी स्नेहमिलन सोहळा थाटात संपन्न

 शिवसेना महिला आघाडी स्नेहमिलन सोहळा थाटात संपन्न 

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने स्नेहमिलन सोहळा, विविध स्पर्धा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला.शिवसेना पुर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व प्रवक्ता प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रमुख श्री. संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत सभागृह, चिंचाळा येथे २७ जानेवारीला पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  माजी जिल्हा संघटिका प्रेमिलाताई लेडांगे, प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ फाउंडेशन चंद्रपूरच्या अध्यक्ष सौ. मनस्वीताई संदीप गिऱ्हे, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी रोहिणीताई पाटिल, माजी जिल्हा संघटिका निलीमाताई शिरे, माजी जिल्हा संघटिका उर्मिलाताई जोगी, माजी जिल्हा संघटिका कुसूमताई उदार, कार्यक्रम आयोजक जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे, मंगला पाल, घुग्घुस शहर संघटीका सौ. संध्या जगताप, रूपाली शेंडे, चोरगांवच्या सरपंच तुणाली धनरे, वर्षा राऊत, मालीनी संगने आदींची मंचावर उपस्थिती होती. सोहळ्याला उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.

यावेळी १ मिनीट गेम, संगीत खुर्ची, डान्स स्पर्धा (मुले, मुली, महिला), हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन मंजुषा वैद्य यांनी केले.या कार्यक्रमाला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना महिला आघाडी आजी-माजी पदाधिकारी व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत