Breaking News

नववर्षाच्या मध्यरात्री तरुणाचा खून वारजे भागातील घटना; चौघे अटकेत

 नववर्षाच्या मध्यरात्री तरुणाचा खून वारजे भागातील घटना; चौघे अटकेत


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,पुणे : नववर्षाच्या मध्यरात्री वारजे माळवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. वारजे पोलिसांनी तातडीने तपास करुन चार संशयितांना अटक केली. भूमीपूत्र युवराज कांबळे (वय २३, रा. वारजे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत कांबळे याचा भाऊ वीरफकीरा याने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे आणि त्याचा मित्र मध्यरात्री वारजे भागातील विठ्ठलनगर परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी चिक्या उर्फ ओंकार जगताप आणि साथीदारांनी त्याला गाठले.


त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. कांबळे याच्या डोक्यात दगड मारला. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. कांबळे याच्या मित्राने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वारजे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कांबळे याच्या खून प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत