बांधकाम अभियंता दळवी यांचे आशीर्वादाने निकृष्ट दर्जाची रेती वापर
बांधकाम अभियंता दळवी यांचे आशीर्वादाने निकृष्ट दर्जाची रेती वापर
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,शेख हक्कानी, जिवती : तालुक्यात ग्राम विकासाचे नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्राम पातळीवर विकासाचे कामे सुरू आहेत.त्यात काही ग्रामपंचायत नी तर एकच एक ठेकेदार याना पाच वर्षांत कामाचा पूर्ण ठेकाच दिला आहे की काय अशी अवस्था झाली आहे.कारण पाच वर्षात एकच ठेकेदार ग्राम पंचायत चे कोणते हि काम करत असतात.त्यांची निविदा प्रकाशित केली जाते की नाही.
हे अद्याप स्पष्ट झालेले दिसत नाही. ठेकेदार वर्गावर अभियंत्यांच्या हात असून हे ठेकेदार वर्गाला काम करताना ढील देतात.कामाची गुणवत्ता टिकवण्याचे नावाखाली चांगलें मटेरियल वापरण्याची गरज असताना त्या ठिकाणी नाल्यातील माती मिश्रित काळी रेती वापर करणे सुरू आहे.नागरिक विचारणा केली की अभियंते सांगतात की या रेतीत गुणवत्ता आहे.आणि मग नागरिक गप्प होतात.पण हीच रेती इतर मर्जी बाहेरील ठेकेदार वर्गाला अशी रेती वापरताना मात्र त्यात गुणवत्ता आठळून येत नाही.
असा प्रताप दिसून येत असल्याचं नागरिकात नाराजीची चर्चा आहे.यात अभियंत्यांना आर्थिक आशीर्वाद तर नाही ना असा संशय नागरिक घेत आहेत. काही गावात तर यापूर्वीचे अभियंत्याचे कृपेने अर्धवट अवस्थेत काम सोडून बिले काढले आहेत.निविदा काढली नसल्यामुळे ग्रामस्थांना त्याची कल्पना नसते.आणि ग्राम सभेत या बद्दल न बोलताच परस्पर ठराव संमत करून कामे ठेकेदार वर्गाला दिली जातात अशी ग्रामस्थाकडून ऐकण्यास मिळत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत