Breaking News

संकटात सापडलेल्या महिलांनी 112 वापरावा - पूजा गायकवाड

 संकटात सापडलेल्या महिलांनी 112 वापरावा - पूजा गायकवाड

मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोदकुमार डांगरे, बेला : संकटात सापडलेल्या महिलांनी 112 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून पोलिसांची तातडीने मदत घ्यावी व स्वतःची सुरक्षा करून घ्यावी. असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी बेला येथील महिलांना केले. त्या सूर्योदय प्रभाग संघ व पोलीस स्टेशन बेला यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जागतिक महिला दिनाच्या मेळाव्यात उद्घाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य वंदनाताई बालपांडे होत्या.तर पं.स. सदस्य पुष्कर डांगरे, सरपंच अरुण बालपांडे, ठाणेदार अजित कदम, उमेद अभियानचे कुमरे, प्रभाग समन्वय अजित जगताप, प्रज्ञा अवचट, विविध बँक व्यवस्थापक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. गायकवाड यांनी स्वतःची सुरक्षा व वाढते अपघात यामध्ये घ्यावयाची काळजी समजावून सांगितली. आणि पतीला हेल्मेट किंवा सीट बेल्ट गिफ्ट करा. असे आवाहन केले.

   कार्यक्रमाला सालईराणी, कळमना, सावंगी येथील महिला बचत गटाच्या असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित झाल्या होत्या. सूर्योदय प्रभाग संघाच्या अध्यक्ष  सुवर्णा डांगरे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी दक्षता समितीच्या प्रज्ञा अवचट, कुंता डायरे व आशा वर्कर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नृत्य आणि नाटकामुळे महिला प्रेक्षक बेहद खुश झाले. सूत्रसंचालन संचालन माया थूल व सोनू चकोले यांनी केले. दिपाली मानकर, प्रतिज्ञा खोब्रागडे ,सीमा ,रंजना कांबळे, सीमा पोटे, सुमित्रा भोसरी , विना गोडघाटे यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले केले. असंख्य महिलांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत