Breaking News

सुरक्षा रक्षक मंडळाला पडला कामगार कायद्यांचा विसर

 सुरक्षा रक्षक मंडळाला पडला कामगार कायद्यांचा विसर

 सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ होणार केंव्हा ? 

 यासाठी महासंघ करणार धरणे आंदोलन....

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ एप्रिल २०२२ रोजी होणारी वाढ १२ महिने उलटून ही अद्याप झाली नाही. कायद्याने व शासनाने मंडळाच्या अध्यक्षांना पुर्ण अधिकार दिलेले असुन मागील १२ महिन्यांपासून वेतनवाढ व इतर कायदेशीर मागण्या पासुन वंचित ठेवले आहे.यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यावरून असे निदर्शनास येते की मंडळाला पडला कामगार कायद्यांचा विसर मंडळाचे लक्ष वेधण्यासाठी करणार वार सोमवार दि.१३/०३/२०२३ रोजी अप्पर कामगार आयुक्त कार्यालय, शिवाजी नगर पुणे येथे धरणे आंदोलन करणार आहे.

सुरक्षा रक्षकांच्या मागण्या 

 १) २०% वेतनवाढ फरकासह लागु करा.

२) अर्जित रजा,नैमित्तिक रजा, ऋग्णता रजा या घरभाडे भत्ता सह लागु करा.

३) राष्ट्रीय सुट्टयाचे वेतन अतिकालिक दराने देऊन ३ वरून ८ इतक्या जाहीर कराव्यात.

४) भविष्य निर्वाह निधी शी सलग्न असलेल्या कर्मचारी ठेव सलग्न विमा योजना लागू करा.

५) बेरोजगार सुरक्षा रक्षकांना किमान वेतन घरभाडे भत्ता सह देण्यात यावे.

६) उपदान प्रदान अधिनियम (४क) विमा योजना लागु करा.

अशी माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ चे अध्यक्ष युवराज नाळे,सचिव तुकाराम कुंभार, पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजकुमार काळे, उपाध्यक्ष गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष शंभु खंडाळे,महीला प्रदेश प्रमुख मंजना आढारी, प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पारधी आणि प्रदेश संघटन मंत्री अविनाश मुंढे,महीला प्रदेश उपा नंदा धोत्रे,महीला प्र सं मंञी मीना आढारी,समीर अढारी,यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत