Breaking News

सेलू तालुक्यातील गहू, ज्वारी, हरभरा पीक झोपले अवकाळी पावसाने शेती पिकाचे नूकसान

 सेलू तालुक्यातील गहू, ज्वारी, हरभरा पीक झोपले अवकाळी पावसाने शेती पिकाचे नूकसान

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सेलू : सेलू तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नूकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. तालूक्यात सोमवारी रात्री 11 वाजेच्या सूमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामूळे गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले तर कापणी केलेल्या हरभरा पिकांच्या गंजीवरील ताडपत्र्या वा-यामूळे उडून गेल्याने हरभरा पिकांच्या गंजी भिजल्या आहेत. 

अगोदरच मेटाकूटीस आलेल्या शेतक-यांना असा निसर्गााच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. हरभरा, गहू ,ज्वारी पिकांना अगोदरच उतारा कमी येत असताना असा असमानी सकटांचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे. एकीकडे सरकार मोठ्या प्रमाणात खत, रसायनिक औषधी, बियाणे यांच्या किंमतीत वाढ करत आहे. मात्र शेती मालास कमी भाव असल्याने शेती करणे परवडत नसून त्यामध्ये असा आस्मानी व सूलतानी संकटाचा सामना शेतक-यांना करावा लागत असून शासनस्तरावरून मदत मिळण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत