Breaking News

कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव येथे शॉर्टसर्किटमुळे कापसाला आग

कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव येथे शॉर्टसर्किटमुळे कापसाला आग

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, कोरपना : तालुक्यातील कान्हाळगाव येथील एका घरात साठवलेल्या कापसाला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना शनिवार दि. १५ ला सकाळी दहा वाजता घडली.

प्राप्त माहितीनुसार, कान्हाळगाव येथील रामचंद्र झोलबाजी वासेकार यांचा कापूस वेचणी झाल्यानंतरचा कापूस जुन्या घरात साठवून होता. आज दहा वाजता दरम्यान अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत तेथील ५ क्विंटल कापूस , दरवाजा , कवेलुचे तीन पत्राचे नुकसान झाले. त्याची अंदाजे किंमत ५८ हजार रुपये वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा महसूल व पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी तलाठी कमलवार , पोलीस उपनिरीक्षक खेकाडे, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत