वणा चे एकवीस , नांद चे सात धरणाचे गेट उघडले, बेला भागात रात्रभर पाऊस
वणा चे एकवीस , नांद चे सात धरणाचे गेट उघडले, बेला भागात रात्रभर पाऊस
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे,बेला : बुधवारच्या रात्री बेला भागात रात्रभर विजांच्या कडकडाटासह वादळी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून होऊ लागले. मागील हप्त्यापासून येथे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतमजुरांनाही सुगीचे दिवस आले. अधिक मासामुळे उत्तरवायणी असलेल्या शिंगोरी येथील नांद नदीवर भाविकाची बरीच मोठी गर्दी असते परंतु धरणाला पाणी सोडल्याने मंदिर पूर्णतः बुडाले आहे कोणीही भाविकांनी जाऊ नये . जवळच्या निम्न लोवर वना प्रकल्पाच्या वडगाव व शेडेश्वर येथील नांद जलाशय तुडुंब भरल्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी वेना व नांदच्या नदीपात्रात सोडले आहे. वडगाव जलाशयाची पूर्ण 21 दारे 50 cm ने तर नांद जलाशयाची सर्व 7 दारे 20 cm ने उघडण्यात आली आहे . धरण 69.19 टक्के भरले असून नदीकाठावरील शेतकऱ्यांनी गाई,गुरे ढोरे, बैल जनावरांसह नदी ओलांडू नये. खबरदारी घेऊन स्वतःची सुरक्षा स्वतः करावी व सावधगिरी बाळगावी. असे आवाहन पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रणील शेंडे व भूपेश वाघ यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत