भिसी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे
रुग्णांना दिली जाते बाहेरून औषधी घेण्यासाठी चिट्टी
रुग्णांची मात्र हेळसांड, गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, जावेध पठान, चिमूर : तालुक्यातील शेवटच टोक भिसी हे गाव आहे. या परिसरातील अनेक लहान खेड्यांची भिस्त या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. मात्र इथे रविवारच्या व ईतर दिवशी दिवशी डॉक्टर, चपराशी, नेहमी उपस्थित राहत नसल्याने हे आरोग्य केंद्र राम भरोसे ठरले असून परिणामी रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा भार व रुग्ण उपचार सेवा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाकडून चालवले जाते. या करीता आरोग्य विभागाकडून तज्ञ डॉक्टरांची रुग्ण सेवेसाठी नियुक्ती केल्या जाते. परंंतु रुग्ण सेवेसाठी नियुक्त डॉक्टर आपल्या कर्त्यव्याप्रती निष्क्रिय असून कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. शिवाय ते महिन्याच्या कित्येक दिवसाला सतत गैरहजर रहात असल्याच्या तक्रारी गावक-यांकडुन येत आहेत.
दि. २४ सप्टेंबर भिसी प्रा. आ. केंद्रातील दवाखान्यात प्रसुतीसाठी तिन महिला आल्या होत्या. सकाळी दवाखान्यात दाखल झाल्या, एका महिलेचे बाळंतपण झाले. दुसऱ्या महिलेला १०:०० ते ११:०० च्या दरम्यान नागपूरला रेफर केले . आणि एका महिलेची प्रसुती बाकी आहे .या सर्व घटनेची चौकशी केली असता दोन्ही डॉक्टर दवाखान्यात गैरहजर होते. भिसी आरोग्य केद्रामध्ये कुंटूब नियोजन ऑपरेशन करण्यासाठी ६ महिला भरती करण्यात आल्या आहे. बाहेर गावातील येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना दवाखान्यात डॉक्टर नसल्याने त्यांना चिमूरच्या उपजिल्हा दवाखान्यात हलवण्यात येते.
शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च आरोग्य सेवार्थ होत आहे. मात्र असे निष्क्रिय डॉक्टर पगार घेत कामचुकारपणा करत असल्याची तक्रार चिमूर तालुक्यातील ऑल इंडिया पॅथर सेना अध्यक्ष आशिष बोरकर व ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करनार आहे. आपल्या कर्तव्य सेवा वेळी डॉक्टर गैरहजर राहुन पगार घेणाऱ्या दोषी डॉक्टरांवर तसेच कर्मचाऱ्यांवर सात दिवसाचे आत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावातील आरोग्य केंद्रात औषधी साठा, डॉक्टरची रूग्णसेवा, सुरळीत राहावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, यांचे विशेष लक्ष असते, परंतु या अधिकाऱ्यांचे भिसी आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष होत असल्याने भिसीतील आरोग्य सेवा कोलमडलेली आहे. तरी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भिसी च्या आरोग्य केंद्राची तपासणी करून आरोग्य सेवा रूग्णांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.
रुग्णांना दिली जाते बाहेरून औषधी घेण्यासाठी चिट्टी
या प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाहेरील मेडीकल मधून औषधी घेण्यासाठी सुद्धा चिट्टी लिहून दिली जात असल्याची सुद्धा माहिती आहे त्यामुळं अश्या वैद्यकीय अधिकारीवर तात्काळ कारवाई करावी अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत