Breaking News

बल्लारपूर–विसापूर मागील मार्गावरील वाढलेल्या झाडांमुळे अपघाताचा धोका; फांद्या छाटून रस्ता तातडीने सुरक्षित करण्याची मागणी

बल्लारपूर–विसापूर मागील मार्गावरील वाढलेल्या झाडांमुळे अपघाताचा धोका; फांद्या छाटून रस्ता तातडीने सुरक्षित करण्याची

बल्लारपूर भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. संदीप श्रीहरी पोडे यांचे तहसीलदारांकडे निवेदन

माहा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:-–बल्लारपूर ~विसापूर या मागील मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संबंधित विभागामार्फत तातडीने झाडांच्या फांद्या छाटून रस्ता सुरक्षित व वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा बल्लारपूर तालुका अध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांनी नितीन पाडे, महेश तुराणकर, अभिषेक भोजेकर, चेतन भोयर व आशिष उरकुडे यांच्या समवेत तहसीलदार बल्लारपूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बल्लारपूर–विसापूर मागील मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे व त्यांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसून अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्याने मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, नागरिक, शेतकरी तसेच दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहने मोठ्या संख्येने प्रवास करतात. विशेषतः पावसाळ्यात व रात्रीच्या वेळी झाडांच्या फांद्यांमुळे दृश्यता कमी होत असल्याने गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे व फांद्या छाटण्याची कार्यवाही करावी. तसेच सदर रस्ता सुरक्षित, रुंद व सुरळीत वाहतुकीसाठी खुला करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संदीप श्रीहरी पोडे यांनी केली.

यावेळी तहसीलदार महोदया यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, तसेच रस्त्याची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. निवेदन देताना भाजपा युवा मोर्चा बल्लारपूर तालुका अध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांच्यासह नितीन पाडे, महेश तुराणकर, अभिषेक भोजेकर, चेतन भोयर, आशिष उरकुडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत