डॉ. देवेंद्र अहेर आयुष ग्लोबल अवॉर्ड ने सन्मानित.
डॉ. देवेंद्र अहेर आयुष ग्लोबल अवॉर्ड ने सन्मानित.
शिर्डी येथे आयुष चिकित्सा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यकरिता सन्मानित.
राजुरा:- साईबाबा च्या शिर्डी नगरीत पुष्पक रिसॉर्ट येथे आयुष ग्लोबल अवॉर्ड कार्यक्रम आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AGMA) तरता विस्तार केंद्र राजकोट एमएसएमई टी.डी.सी. (पी.पी.डी.सी. ) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते. आयुष चिकित्सा क्षेत्र मध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. देवेंद्र अहेर यांना आयुष ग्लोबल अवॉर्ड 2023 या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात एमएसएमई राजकोट सेंटर द्वारा क्लिनिक्स सिग्मावर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशंट केअर या विषयावर कार्यक्रम चे मुख्य अतिथी डॉक्टर प्रवीण जोशी द्वारा संबोधित करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून फिल्मस्टार देवदत्त नागेजी डॉ. प्रवीण जोशी, उप संचालक तथा विशेष अतिथी प्रणव पांड्या, प्रशिक्षण अधिकारी ,एमएसएमई टी.डी.सी. (पी.पी.डी.सी.) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार तथा फिल्मस्टार एवं टीव्ही ॲक्टर मिस ऋतुजा वागवे फिल्मस्टार सुयोग गोरे आणि
कलर टीव्ही मराठी एग्जीक्युटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर डॉ. सतीश कराळे ,चेअरमन एआयएमए, डॉ. नितीन राजे पाटील व्हाईस चेअरमन एआयएमए आणि समस्त टीम ए.आय.एम.ए. मान्यवर च्या उपस्थिती मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. देवेंद्र अहेर यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे. ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना आपली वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या व्याधी कमी करण्यासाठी डॉ. अहेर नेहमीच तत्पर असतात.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत