रात्रीच चालतो अवैध रेतीचा गौडबंगाल
रात्रीच चालतो अवैध रेतीचा गौडबंगाल
तहसीलदार अविनाश शेबंटवाड गाड झोपेत,जिल्हाधिकारी गौड यांनी लक्ष देणार का ?
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,शेख हक्कानी, जिवती : सध्या तालुक्यात अवैध रेती तस्करीला उधान आले आहे. रेती तस्करीची झळ सर्वसामान्यांना महागडी रेती खरेदी करून सोसावी लागत आहे. बांधकामात महत्वाचा घटक असलेल्या रेतीची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, याचाच फायदा घेत तालुक्यातील काही रेती माफीयांनी अवैध रेती तस्करीचा सपाटा सुरु केला आहे. हा प्रकार उघडपणे सुरु असुन यात महसुल अधिकाऱ्यांची अप्रत्यक्षपणे महत्वपुर्ण भुमिका असल्याचे सर्वत्र चर्चीले जात आहे. नदी घाटावर रेती बंदीचे कारण पुढे करुन दामदुपटीने एक ब्रास रेतीची किंमत आठ ते दहा हजार रुपये करुन तस्करांनी गरिबांना लुटमारीचा गोरखधंदा सुरु केला आहे.
तालुक्यात अवैध रेती तस्करी मोठया प्रमाणात चालत असून सुद्धा याकडे लक्ष दिले जात नाही, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. प्रशासनातील अधिकारी आपल्या अंगावर बितेल या पोटी दुर्लक्ष करतात की इतर काही मात्र, दरवर्षी लाखोंचा महसूल बुडत असतांना देखील असे का होते हा प्रश्न निर्माण होत आहे.
रेतीचे भाव गगणाला भिडले आहेत, गोंडपिपरी तालुक्यातील रेती घाटावरुन गोंडपिपरी बामनी मार्गाने राजुरा देवाडा भेंडवीघाट या मार्गाने जिवती तालुक्यातील रेती तस्कर रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत अवैध रेतीचा गौडबंगाल राजरोसपणे सुरू असून या कडे तहसीलदार अविनाश शेबंटवाड झोपेचे कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सुरू असून "रेतीची बंदी अन् तस्करांची चांदी" असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तालुक्यात अवैध रित्या खुलेआम रेती साठे दररोजच पहायला मिळत आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाही का ? असा प्रश्नही जनसामान्यांकडून उपस्थित केला आहे
रेती तस्करीची झळ सर्वसामान्यांना महागडी रेती खरेदी करून सोसावी लागत आहे. तालुक्यात दररोज शकडो ब्रास रेती अवैधरित्या हायवा ट्रकने वाहतुक केली जात आहे, तालुक्यातील या मुख्य मार्गाने आणलेल्या रेतीचा वापर तालुक्यात सुरु असलेल्या विकासकामात सुद्धा केला जात आहे, शासनाच्या महसुलाला चुना लावून रेती माफीयांना गब्बर बनविन्याचे काम होत आहे. असे असतानाही प्रशासन मात्र मुग गिळुन बसले असल्याने त्यांच्या कार्यतत्परतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे,
जिल्हाधिकारी गौडा लक्ष देतील का तालुक्यातील सामान्य जनतेचा या बाबी कडे लक्ष लागले आहे. दिखावा म्हणून तहसीलदार अविनाश शेबंटवाड यांनी मंडल अधिकारी तलाठी यांना पाठवून अवैध रेतीचा ढिगाऱ्याचे पंचनामे केले होते त्या कारवाई चे काय झाले चर्चेला उधाण आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी एका दिवसी अवैध रेतीचा ढिगाऱ्याचे फोटो शुट केले. कारवाई होणार असे भाकीत झाले होते परंतु कारवाई झाली नाही पण वेगळीच चर्चा तालुक्यात रंगली दाखवण्यापुरती एखादी कारवाई करून संबधीत विभाग आपली पाठ आपणच थोपटून मोकळे होत आहेत. रेती माफियांवर कठोर कारवाई करून रेती तस्करीला आळा घालावा अशी मागणी केली जात आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत