Breaking News

महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती जिवती तालुक्यातील गावा - गावात पोहचविण्याचे काम प्रशासनाने करावे

 महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती जिवती तालुक्यातील गावा - गावात पोहचविण्याचे काम प्रशासनाने करावे

मनसे तर्फे जिवती तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन 

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : राजुरा विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम भागात असलेल्या जिवती तालुक्यातील गोर - गरीब सामान्य माय - बाप जनतेला होणारा नाहक असा त्रास सहन करावा लागतो. मनसे चंद्रपूर जिल्हा सचिव श्री. प्रकशभाऊ बोरकर व जिवती मनसे तालुका अध्यक्ष शेख हकाणी जी यांच्या नेतृत्व थेट तहसील कार्यालयात संपूर्ण मनसे टीम. जिवती तालुक्यातील सन - २०१८ - १९ ते २०२२ - २३ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक. राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अयशस्वी ठरताना दिसत आहे. घरकुल योजनेच्या यादीत घरकुल लाभार्थ्यांची नावे पण शासनाकडून निधी लाभार्थ्यांना प्राप्त झालेली नाही.  

जलजिवन योजना अभियान हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचेही शासनाने वेळोवेळी जाहीर केले आहे. परंतु जिवती तालुक्यातील १५९ गावात पिण्याच्या पाण्याची टंचाईची परिस्थिती डोळ्यासमोर बघत आहोत. सद्यस्थितीत विदर्भातील सुमारे ३,४०० गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याची नोंद आहे.महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती जिवती तालुक्यातील गावा - गावात पोहचविण्याचे काम प्रशासनाने करावे. या सर्व मुद्यांना निवेदनाच्या माध्यमातून जिवती तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. १० ते १२ दिवसात या सर्व मुद्यांचां तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवती तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने करेल. 

जिल्हाध्यक्ष श्री. मनदीप जी रोडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सचिव श्री. प्रकाश जी बोरकर, तालुका अध्यक्ष जिवती शेख हकानी जी, मनसेच नवं नेतृत्व निनांद बोरकर, मनसेच नवं नेतृत्व श्रीहरी कुसळे, नंदेवार ताई, नागेश खांडेकर तालुका उपाध्यक्ष मनसे, अक्षय भांदक्कर व सर्व मनसे टीम निवेदन देताना उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत