गडकरी, पारवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, तर रामटेकसाठी काँग्रेसचा बॅकअप प्लॅन तयार
गडकरी, पारवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, तर रामटेकसाठी काँग्रेसचा बॅकअप प्लॅन तयार
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर: नागपूरचे उमेदवार, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महातुयीचे उमेदवार राजू पारवे बुधवारी (ता.२७) आपआपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामुख्याने नागपूरला येणार आहेत.
गडकरी तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सोमारे जात आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पराभूत केले आहे. यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात शहराध्यक्ष व पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.
आता गडकरी ‘हॅट्ट्रिक'' करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या ते आपल्या शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकानाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. गडकरींच्या उमेदवारी अर्जाच्या माध्यमातून भाजपही शक्तिप्रदर्शन करणार आहे.
काँग्रेसचा बॅकअप प्लान तयार
उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिंदे सेनेच्यावतीने रामटेकची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदार कृपाल तुमाने यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. पारवे यांच्या विरोधात काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर भाजपचा आक्षेप आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत