Breaking News

मेरे घर के ऊपर से वायर… ‘, ही कसली जनहित याचिका, उच्च न्यायालय म्हणाले

 मेरे घर के ऊपर से वायर… ‘, ही कसली जनहित याचिका, उच्च न्यायालय म्हणाले

महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर : ‘मेरे घर के ऊपर से वायर जा रही, कृपया उसे हटाये …’ या ओळी वाचत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले आणि ही कसली जनहित याचिका म्हणत नाराजी व्यक्त केली.

स्वतःच्या घरापुढील वीज खांब हटविणे हा वैयक्तिक विषय असून त्याकरिता जनहित याचिका दाखल केली जाऊ शकत नाही, असेही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. मानकापूर येथील मो. उमर खान यांनी स्वतःच्या घरापुढील वीज खांब हटविण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हा खांब परिसरातील रहिवाशांसाठी धोकादायक आहे. खांब हटविण्यासाठी महानगरपालिकेला तक्रार केली होती, पण दखल घेण्यात आली नाही, असे त्यांचे म्हणणे होते.

याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्या. अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हा जनहित याचिकेचा विषय होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले व याचिकाकर्त्याला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याची मुभा देऊन याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजूमांडली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत