पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली येल्लापुर येथील नागरिकांची भेट
पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली येल्लापुर येथील नागरिकांची भेट
पंधरा दिवसांत होणार जलजिवन मिशनचे काम परिपूर्ण
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, हकानी शेख,जिवती : दिनांक ५ एप्रिल ला जिल्हा पाणीपुरवठा आधीकारी हर्षवर्धन भौवरे यांनी जलजिवन मिशनच्या ठेकेदाराला घेऊन येल्लापुर गावाची भेट घेतली व गावातील नागरिकांशी पाण्या संदर्भात चर्चा हि केली व गावकऱ्यांकडून पाण्याच्या समस्या ही जाणुन घेतल्या व गावातील जलजिवन मिशन अंतर्गत काम केलेल्या कामाची सर्व गावकऱ्यांसोबत गावामध्ये पाहणी केली पाहणी अंतर्गत कामामध्ये मोठ्या प्रमाणावर संबंधित ठेकेदाराने काम थातुरमातुर केल्याचे निदर्शनास आणून ठेकेदाराला दिले.
गळती लागलेल्या पाण्याच्या टाकिला चांगल्याप्रकारे काम करुन देण्याचे कडक आदेशही दिले व पाइपलाइन गावामध्ये बऱ्याच ठिकाणी फुटुन आहे हेही कंत्राटीदाराच्या लक्षात आणुन देणान्यात आले व एकुण एक कामाची गुणवत्ता तपासण्यात आली संबंधित ठेकेदाराला येणाऱ्या 15 दिवसांमध्ये जल जिवन मिशन चे काम परिपूर्ण करुन देण्यासाठी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी कंत्राटीदाराला आदेश दिले आहेत.!
मि पंधरा ते वीस दिवसांमध्ये जल जिवन मिशन चे काम परिपूर्ण करुन देण्यासाठी ठेकेदाराला आदेश दिले आहेत येणाऱ्या 15 दिवसांमध्ये तुमच्या घरोघरी पाणी पोहचेल व संपूर्ण गावामध्ये फिरुन कामाची पाहणी केली व कुठे कुठे पाइपलाइन फुटलेली आहे पाण्याच्या टाकीला गळती लागलेली आहे,ती ठेकेदाराला चांगले व छान काम करुन देण्यासाठी ठेकेदाराला आदेश दिले आहेत. अजून मि १५ दिवसाने येल्लापुरला भेट देणार आहे व त्यांचा पाण्याचा विषय मार्गी लावनार आहे..!
- हर्षवर्धन भौवरे, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा अधिकारी, चंद्रपूर..!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत