Breaking News

रेतीबंदीमुळे रेती तस्करी जोमात महसूल विभाग कोमात

 ठेकेदारावर मजुरावर आली उपासमारीची वेळ, मुजोर प्रशासनाला जाग येणार का?

महसूल विभाग, पोलीस विभाग लागले वसुलीच्या कामाला?

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर / जिवती : मागील काही वर्षापासून रेतीबंदी असल्यामुळे महसूल विभाग पोलीस विभाग स्वतःची पोळी शेकण्यात मग्न असून यांना सामान्य जनतेचा काही घेणं देणं नाही असे मत सुज्ञ नागरिकाकडून व्यक्त करण्यात येत आहे. रेती घाटाचे लिलाव न झाल्यामुळे खाजगी बांधकाम ठेकेदारावर, मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र मुजर प्रशासनाला अजूनही जाग आली नाही. सरकारी बांधकामाच्या अंदाजपत्रकानुसार रेतीचे दर ठरल्याप्रमाणे बिल तयार होते. 

रेतीबंदीमुळे चोरीची महागडी रेती सरकारी बांधकाम करणाऱ्या ठेकदाराला महाग रेती घेणे परवडत नाही. कारण अंदाजपत्रकात जे रेट ठरले आहे त्या हिसाबाने कामाचा एस्टिमेट तयार केला जातो. परवानाधारक ठेकेदारांने काम घेतले असून बांधकामाची सुरुवात अजून पर्यंत केलेली नाही. काही बांधकामे अपूर्ण असून. रेती मुळे शासकीय बांधकाम ठप्प असल्याने मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. रेती हे बांधकामाचा मुख्य दुवा असून यामुळे अनेक लोकांचे आर्थिक बजेट डगमगले आहे. घरकुलाची बांधकामे ठप्प असून ज्या लाभार्थ्यांना नवीन घरकुल आले आहे त्यांनीही घरकुलाचे कामे सुरू केले नसल्यामुळे त्यांना लवकर काम सुरू करा असे नोटीस संबंधित विभागाकडून आले आहे.

 बांधकामावर अवलंबून असलेल्या ठेकेदार व मजुराने कसे जगावे या चिंतेत मजूर वर्ग सापडलेला आहे. आणि परीक्षेच्या वेळ असल्याने खाजगी शाळेत शिकत असलेल्या मुलांच्या शुल्क भरण्यासाठी लागलेला तकादा त्यातच बांधकाम बंद असल्यामुळे. या दुहेरी अचानक आलेल्या संकटाला ठेकेदाराला मजूर वर्गाला तोंड देणे शक्य नाही. मात्र स्थानिक प्रशासन हे कुंभकर्णी झोपेतून अजूनही जागे झाले नाही. रेती बंद असल्यामुळे महसूल विभाग व पोलीस विभागाची बल्ले बल्ले झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

अशी पण चर्चा आहे की महसूल विभागाच्या काही अधिकारी पोलीस विभागाचे काय अधिकारी रात्र जागून काढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्या मागचे कारण असे आहे की अवैध रेती चोर तस्कराकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन घडतं असल्याची खमंग चर्चा समोर येत आहे. या संबंधित विभागाला एवढी ही जाण नाही की मजूर वर्गाचे काय होईल. 

मजूर वर्गाला बांधकामाशिवाय जगण्यासाठी दुसरा काही पर्याय नाही. आयुष्यभर ज्यांनी फक्त बांधकाम मध्येच काम केले. रेतीबंद मुळे बांधकाम ही बंद झाल्याने त्यांना कुठेही काम मिळत नसल्याने ही परिस्थिती मजुरावर आली असून मजुरा समोर आत्महत्या शिवा पर्याय उरला नसल्याचे मजूर वर्ग बोलून दाखवत आहे. यावर शासन प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावे अशी मागणी ठेकेदार व मजूर वर्गांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत