Breaking News

रेशन कार्ड धारकांनी मार्च अखेर पर्यंत ई- केवायसी करून घ्यावी. : पुरवठा निरीक्षण अधिकारी

रेशन कार्ड धारकांनी मार्च अखेर पर्यंत ई- केवायसी करून घ्यावी. : पुरवठा निरीक्षण अधिकारी 

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : शासनाने शिधापत्रिका धारकांना ई -केवायसी करणे बंधनकारक केले ई केवायसी न केल्यास शासनाकडून मिळणारे धान्य मिळणार नाही स्वस्त धान्य परवानाधारक दुकानदाराकडे ई पास मशीनद्वारे मोफत केवायसी करण्यात येत आहे. तर काही तांत्रिक बाबी निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानात न जाता ही काही मिनिटात आपल्या मोबाईलवरून कुटुंबाची ई केवायसी पूर्ण करण्यात येनार आहे त्याकरिता शासनाने मेरा ई -केवायसी हे ॲप उपलब्ध करून दिले . केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची अखेरचे मुद्दत देण्यात आली आहे. असे आव्हान तालुका पुरवठा अधिकारी विक्की देवघरे यांनी केले आहे 

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्तभाव धान्याचे वितरण करण्यात येते पास मशीनद्वारे धान्याचे वितरण केल्या जात असेल तरी तांत्रिक अडचणी आल्यास ओटीपी चा वापर करून लाभार्थ्यांना धान्याची उचल करता येते.

परंतु संबंधित लाभार्थ्याचा मोबाईल नंबर शिधापत्रिकेसी संलग्न असणे आवश्यक आहे स्वस्त धान्याचे वितरण करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे धान्य दुकानदाराच्या अनेक तक्रारी येत आहे अशाप्रकारे आळा बसणे आवश्यक आहे स्वस्त धान्याचे वितरण निकोस पद्धतीने व्हावे यासाठी ई पास मशीन वर धान्याचे वितरण केल्या जात आहे तालुक्यातील अनेक कार्डधारकांनी मोबाईल नंबर लिंक केला नाही त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी आपला मोबाईल नंबर शिधापत्रिकाशी लिंक करावा असे पुरवठा विभागाकडून सुचित करण्यात आले आहे.

अद्याप अनेक शिधापत्रिकाधारकांनि वेगवेगळे कारणे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा ई -केवायसी करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत वाढ दिली आह कोरपणा तालुक्यातील 19243 लाभार्थ्यांची ई -केवायसी होणे बाकी आहे तरीही ज्यांची ई केवायसी अद्याप करून घेतलेली नाही, त्यांनी तात्काळ 31 मार्च र्पर्यंत इ केवायसी करून घेणे गरजेचे आहे, यासाठी सर्व स्वस्त धान्य लाभार्थ्यांना आव्हान करण्यात येत आहे. विक्की देवघरे - पुरवठा निरीक्षन अधिकारी कोरपणा तहसील कार्यालय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत