कर्मयोगीच्या वतीने ' जसापूर ' स्वच्छ !
कर्मयोगीच्या वतीने ' जसापूर ' स्वच्छ !
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बेला : जवळचे जसापूर खेडेगाव कर्मयोगी फाउंडेशनच्या वतीने स्वच्छ करण्यात येत आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रविवारला जसापुर येथे स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे. त्यामध्ये गावातील सर्व नागरिक सहभाग घेत आहे. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सुरकार, प्रदीप चौधरी, ग्रा.पं. सदस्य प्रदीप वैरागडे, साहिल करडभाजणे, वैभव मून, कार्तिक निस्ताने, दिपाली अनकर, उमेश अवचट, रंजीत कुबडे, अतुल वरकाडे, राकेश चौधरी, अरविंद वैरागडे व गंगाधर मून कालच्या स्वच्छता अभियानात सहभागी होते.
बातमी संकलन : दिनेश गोळघाटे, बेला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत