कोरोना काळात बंद झालेली काजीपेठ रेल्वेगाडी पुन्हा सुरू !
आमदार देवराव भोंगळे यांच्या मागणीला यश.
महा घडामोडी न्युज, जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर/ राजुरा : कोरोना महामारीच्या काळात प्रवाशांच्या कमतरतेमुळे बंद करण्यात आलेली काजीपेठ-बल्लारशा-काजीपेठ ही पॅसेंजर रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राजुरा विधानसभेचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांची मागणी लक्षात घेऊन आजपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
ही रेल्वेगाडी काजीपेठ बल्लारशा काजीपेठ अशी धावणार असून, ती रात्री १० वाजता काजीपेठ येथून सुटेल आणि पहाटे ३ वाजता बल्लारशा रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या गाडीला १५ थांबे असून गाडीचा क्रमांक १७०३५ असा राहणार आहे. यासोबतच बल्लारशा स्थानकावरून परत काजीपेठकडे वापस जाणारी गाडी पहाटे ४ वाजता सुटून रात्री ९ वाजता काजीपेठ रेल्वे स्थानकावर पोहोचेल आणि या गाडीचा क्रमांक १७०३६ असा राहणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
ही रेल्वे गाडी सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून महाराष्ट्रातून तेलंगणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना सोईचे झाले आहे. या प्रवाशी हिताच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन जनमागणी पुर्ण केल्याबद्दल भाजपा राजुरा तालुकाचे सचिव प्रदीप पाला यांनी प्रवाशांच्या वतीने आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.
______________________________________________
सीसीआयची बंद कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करा !
आमदार देवराव भोंगळे यांची मंत्री जयकुमार रावल यांचेकडे मागणी.
चंद्रपुर जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) चे कापुस खरेदी केंद्रे मुदतीआधीच अचानक बंद करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना आपला कापुस खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने विक्री करावा लागत आहे. त्यामुळे सीसीआयकडून बंद करण्यात आलेली कापुस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी मागणी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल यांचेकडे निवेदन देऊन केली आहे.
विदर्भ हा महाराष्ट्रातील ३०% कापूस उत्पादन करणारा प्रमुख प्रदेश असून विशेषतः राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कापुस उत्पादन होते. परंतू सीसीआयने आपली कापुस खरेदी केंद्रे बंद केली असल्याने ७ हजार ४२० रूपये प्रती क्विंटल सरकारी हमीभावापेक्षा ६ हजार ८०० इतक्या कमी दराने शेतकऱ्यांना आपला कापुस खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून योग्य पर्यायाअभावी अजुनही हजारो शेतकऱ्यांच्या घरात विक्रीविना कापूस पडून आहे.
त्यासाठी शासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून सीसीआयने बंद केलेली कापुस खरेदी केंद्रे पुर्ववत सुरू करावी अशी मागणी आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल यांना निवेदन देत केली आहे.
बातमी संकलन : सतीश जमदाडे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत