स्व. कैलाश शिवणगे यांच्या पीडित कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्या - सुदाम राठोड
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : दि. 07-07-2025 ला सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेतीमध्ये टमाटरचे रोप घेऊन जिवतीवरून शेणगावला येत असताना जिवती जवळच्या घाटामध्ये दगड कोसळून दगड गाडीला लागला आणि कैलास शिवणगे यांची गाडी खाली पडली व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना चंद्रपूर येथे दवाखाण्यामध्ये भरती केले व तेथून त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तरी कैलाश शिवणगे यांच्या पीडित कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे अस्या प्रकारचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी तहसीलदार जिवती यांना निवेदन देत स्व. कैलाश शिवणगे यांच्या कुटुंबियांना अपघात विमाच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली यावेळी उपस्थित नरशिंग हामने उपसरपंच शेणगाव, विशाल राठोड, जब्बार शेख, बळीराम लक्ष्मण मस्के, लक्ष्मण कोडापे आदी होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत