"सुगंधी" स्कँडल: पिट्टीगुडा पोलीस ठाण्याच्या सावलीत गुटख्याची खुलेआम विक्री!
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : राज्यात सुगंधित तंबाखू व गुटख्यावर बंदी असतानाही, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड्यापाड्यांमध्ये सर्रासपणे गुटखा आणि तंबाखू विक्री सुरू आहे. कायद्याची भीती न ठेवता खुलेआम चालणारी ही अवैध विक्री पोलीस व अन्न औषधी प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
बंदी असूनही खुलेआम विक्री!
राज्य शासनाने सुगंधित तंबाखू, गुटखा व खर्रा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातलेली असून, हे पदार्थ कर्करोगासह अन्य घातक आजारांना निमंत्रण देतात. तरीदेखील पिट्टीगुडा परिसरातील किराणा दुकानांमध्ये, पानठेल्यांवर आणि दुचाकी-चारचाकी वाहनांमधून हे पदार्थ सर्रास विकले जात आहेत.
चंद्रपुर (महाराष्ट्र) सहित महाराष्ट्र राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू (pan masala) ची विक्री आणि उत्पादन बंदी जुलै 2012 पासून लागू करण्यात आली आहे.
-
महाराष्ट्र शासनाने 20 जुलै 2012 पासून गुटखा, पान मसाला आणि इतर ‘flavoured tobacco’ पदार्थांवर पूर्ण बंदी घातली आहे.
हा निर्णय महाराष्ट्र अन्न सुरक्षा व मानक कायदा, 2006 (FSSA) अंतर्गत अंमलात आणण्यात आला, ज्यामुळे या पदार्थांचा निर्माण, साठवण, वितरण आणि विक्री हा सर्व काही प्रतिबंधित ठरला
यापूर्वी 2002 आणि 2008 मध्येही गुटखा बंदीसाठी प्रयत्न झाले होते, परंतु न्यायालयीन अडचणींमुळे त्या प्रयत्नांना अडथळा आला. मात्र 20 जुलै 2012 नंतरचा बंदी आदेश बंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला जेणेकरून अंमलबजावणीमध्ये बळ निर्माण झाले.
"इगल खर्रा" आणि "माझा खर्रा" हे बाजारात pouch (पिशवी) स्वरूपात सहज मिळतात आणि ते सुगंधित तंबाखू, चुन्याचा अर्क व कॅमिकलयुक्त घटकांपासून बनलेले असतात.
-
हे ब्रँड राज्याबाहेरून (विशेषतः मध्यप्रदेश, तेलंगणा) आणले जातात आणि गुप्त मार्गाने गावांमध्ये पोहोचवले जातात.
-
खर्रा, गुटखा किंवा सुगंधित तंबाखू — या सर्व पदार्थांवर महाराष्ट्रात कायदेशीर बंदी असतानाही, "इगल", "माझा", "रॉयल", "पटाखा", "तुलसी" यांसारखे ब्रँड खुल्या बाजारात व किराणा दुकानांमध्ये विकले जात आहेत.
तेलंगणा सीमेजवळचा गैरफायदा?
जिवती तालुका तेलंगणा सीमेला लागून असल्याने तेलंगणातून मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित तंबाखूची तस्करी होत आहे. त्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे वृत्त आहे.
हातमिळवणी की दुर्लक्ष?
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. काहींनी तर "हातमिळवणीची शक्यता नाकारता येत नाही" असेही म्हटले आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
तरुणाई आरोग्याच्या दाराशी!
या अवैध गुटखा विक्रीचा सर्वात जास्त फटका शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांवर होत आहे. व्यसनाधीनतेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून युवकांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आले आहे.
नागरिकांची मागणी:
"पिट्टीगुडा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गुटखा विक्रीवर त्वरित बंदी घालावी. अन्न व औषधी प्रशासनाने देखील कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल," — स्थानिक नागरिकांची तीव्र मागणी.
प्रशासनाकडून तात्काळ कारवाई आवश्यक:
हा विषय केवळ आरोग्याशी संबंधित नसून, सामाजिक आरिष्टाचा संकेत देतो. त्यामुळे पोलिस, अन्न व औषधी विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने संयुक्त कारवाई करत, गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे.
पोलिस प्रशासन यांचा दावा : “कोणताही अवैध गुटखा व्यवहार नाही, आदिवासी जनता असे करत नाही”
पिट्टीगुडा परिसरातील गुटखा व सुगंधित तंबाखूच्या सर्रास विक्रीबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी संपूर्ण आरोप फेटाळून लावले.
त्यांनी स्पष्ट सांगितले की,
"या परिसरात सुगंधित तंबाखू, पानमसाला किंवा गुटख्याचा कोणताही अवैध धंदा सुरू नाही. येथे मुख्यतः गरीब व आदिवासी लोक वास्तव्यास असून ते अशा प्रकारच्या गोष्टी करत नाहीत. तुम्हाला कोणी तरी चुकीची माहिती दिली असावी."
या उत्तरावरून पोलिस प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे की वस्तुस्थिती लपवली जात आहे, यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. वास्तविक परिस्थिती आणि पोलिस दाव्यांमध्ये विसंगती असल्याने स्वतंत्र चौकशीची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत