Breaking News

चारही श्रमसहितांचे कायदे तात्काळ रद्द करा- कार्तिक वराटे


देशव्यापी संपात ऑल इंडिया बँक कर्मचारी असोसिएशनचा उत्स्फूर्त सहभाग


महा घडामोडी न्युज नेटवर्क, लोकेश पारखी,
चंद्रपूर:- केंद्र सरकारने भांडवलदारांना झुकते माप देत कामगार कायद्यात मोठे बदल करत चार नवीन श्रमसंहितांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे देशातील कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. देशभरातील कामगार संघटनांनी या कायद्यांविरोधात तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली असून, केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी देशव्यापी संप आणि आंदोलनांचा इशारा दिला आहे. देशातील इंटक संलग्न संयुक्त कृती समितीसह सीटू, एचएमएस, आयटक, सेवा, बँक कर्मचारी, सुरक्षा रक्षक, वीज वितरण, परिवहन, फुटपाथ युनियन, ऑटो युनियन, शेतमजूर, माथाडी यांसारख्या संघटनांनी स्पष्टपणे सांगितले की, नव्या चार श्रमसंहितांमुळे कामगारांचे आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक अस्तित्व धोक्यात येणार आहे. या कायद्यांची अंमलबजावणी करताना केंद्र सरकारने कोणतीही कामगार संघटना, विरोधी पक्ष किंवा संसदेला विश्वासात घेतले नसल्याची टीका या संघटनांनी केली आहे. 

   त्याकरिता ट्रेड युनियनने दिलेल्या देशव्यापी संपात आज दिनांक ०९/०७/०२५ ऑल इंडिया बँक एम्प्लॉय असोसिएशनने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात विविध बँकेतील कर्मचारी वर्ग सहभागी झाले. यात बँकेला सुदृढ करणे, बँकेत तात्पुरती ऐवजी नियमित भरती, बँकेतील ग्राहकाचे सेवा कर कमी करणे, कॉर्पोरेटला दिलेले कर्ज माफ न करता त्यांची सक्तीने वसुली करणे, प्रतिगामी श्रम कोडला लागू न करणे, आऊटसोर्सिंग बंद करणे, सरकारी कंपन्या व बँक खासगीकरण बंद करणे इत्यादी प्रमुख मागण्या होत्या.

 
यावेळी कार्तिक मा. वराटे AGS बँक ऑफ इंडिया चंद्रपूर जिल्हा, आशुतोष ओसावार DR बँक ऑफ इंडिया चंद्रपूर जिल्हा, महादेव कामतकर DGS बँक ऑफ महाराष्ट्र, लोकेश चौधरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी बँक ऑफ महाराष्ट्र व संगीता हवेलीकर बँक ऑफ इंडिया चंद्रपूर यानी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम ईस्टर्न महाराष्ट्र बैंक एम्प्लॉयीज एसोसिएशनचे महासचिव कॉ बोभाटे आणि सहसचिव चैतन्य माळोदे यांच्या मार्गदर्शना खाली चंद्रपुर येथे यशस्वी पणे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत