मौल्यवान सागवानाची तस्करी करणारा पिकअप मुद्देमालासह पकडला मात्र आरोपी फरार
शेणगाव वन कर्मचाऱ्यांची कारवाई
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर,जिवती : जिवती तालुक्यात अवैध सागवान व मौल्यवान गारगोटी तस्करी जोमात सुरू असून या याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध सागवानाची व मौल्यवान गारगोटीची तस्करी राजरोसपणे केली जात असल्याचे. वर्तमानपत्रातून किती तरी वेळा बातम्या प्रसारित करण्यात आले. मात्र, या बातम्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे. जिवती तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील सागवान व मौल्यवान गारगोटीची तस्करी करणाऱ्याणा रान मोकळे झाल्यामुळे, अवैध सागवान तस्करी जोमात सुरू होती,
जिवती वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घनपठार माथाळी मार्गावर अवैधरित्या सागवान लाकडाची तस्करी करीत असलेला पिकअप शेणगाव उपवन क्षेत्रातील वनकर्मचार्यांनी पकडला. रात्रीची वेळ असल्याने आरोपी फरार झाले वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिवती वनपरिक्षेत्र अंतर्गत शेणगाव उपवन क्षेत्रातील क्षेत्रसहायक,वनरक्षक,वनमजूर रात्री गस्तीवर असताना रात्री २ वाजेच्या सुमारास घनपठार माथाळी मार्गातुन जाणाऱ्या वाहनाचा संशय आल्याने पाठलाग करून वाहन थाबविले असता. चालक आणि इतर एक इसम वाहन सोडून पळ काढला त्यानंतर त्या वाहनाची तपासणी केली.असता सागवान प्रजातीच्या लाकडाची पाट्या तयार करून तस्करी करीत असल्याचे स्पष्ट झाले मोका पंचनामा करून अंदाजे १ लाख ११ हजार रुपये किमतीचे २१ नग सागवान पाट्या आणि अंदाजे तीन लाख रुपये किमतीचे वाहन क्रमांक -एम.एच १४ cd- १९२४ असा ४ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमालासह वाहन जिवती वनकार्यालयात जमा करण्यात येऊन याप्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर ,वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहायक संजय सलामे,वनरक्षक अनिल गौरकार,वनरक्षक राहुल टेकाम,वनरक्षक किरण नगराळे,वनमजूर संदीप जाधव,भारत उईके यांनी केली आहे.
ही लाकडे कोणत्या वनक्षेत्रातून तोडण्यात आले आरोपी कोण आहे ,किती दिवसापासून ही तस्करी सुरू आहे याचा शोध घेणे वनकर्मचार्यासमोर आव्हान आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत